Women’s Day Special: भाजपच्या मंत्र्यांनी सांगितला पुरुषांना सुखी संसाराचा मंत्र, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– स्मिता शिंदे, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

जो माणूस गृहलक्ष्मीचे कौतुक करायचं सोडून शेजारणीचं कौतुक करतो त्याचा संसार कधीच सुखाचा होत नाही… असा टोला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुरुष मंडळींना लगावला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा महिला मेळावा ओझर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या कपिल पाटलांनी घरातल्या महिलाशक्तीचं कौतुक कसं करावं याचे धडेच पुरुष मंडळींना दिले.

यावेळी विविध क्षेत्रातील २० महिलांचा कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘मुंबई तक’च्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजपच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस असे सर्वपक्षीय नेते हजर होते.

हे वाचलं का?

कपिल पाटील यांनी यावेळी अनेक किस्से सांगितले. “बाई तुला मी नमन करतो. ऐवढे दिवस मला माहीत नव्हतं तू आहेस म्हणुन माझा संसार चाललाय. आम्ही पुरुष घरी गेल्यावर कधी बायकोचे कौतुक करत नाही. घरी गेल्यावर बायकोशी दोन शब्द गोड बोलावं…तिचं कौतुक करावं. आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्ही आहोत म्हणून संसार चालतो आणि घरच्या लक्ष्मीचे कौतुक न करता शेजारणीचं कौतुक करतो”, असं म्हणत कपिल पाटील यांनी पुरुषवर्गाला सुखी संसाराचे कानमंत्र दिले.

या कार्यक्रमाला माजी मंत्री संजय बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार अतुल बेनके, भाजपा नेत्या आशा बुटके, देवराम लांडे, युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश कवडे उपस्थीत होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT