निवडणुकीतील ‘चाणक्य’ समजल्या जाणाऱ्या प्रशांत किशोरांच्या संस्थेवर गोव्यात छापा, गांजा जप्त; एकाला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पणजी: गोव्यात तृणमूल काँग्रेस (TMC) साठी मैदान तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेच्या I-PAC च्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या I-PAC कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला देखील अटक केली आहे. यावेळी आरोपीकडून गांजा (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला आहे.

गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिममधील अनेक बंगल्यांवर छापे टाकले. येथे 8 बंगले I-PAC ने भाड्याने घेतले आहेत. या छाप्यात I-PACच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय 28 आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही सगळी छापेमारी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रशांत किशोर गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल काँग्रेससाठी (TMC) रणनीती तयार करत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशांत आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण प्रशांत किशोर यांचे कोणत्याही पक्षाशी संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांच्यात दुरावा?

ADVERTISEMENT

अलीकडेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दावा केला होता की, त्यांच्या अकाउंटवरुन ‘One Man one Post’ संदर्भात काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. पण याबाबत त्यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

ADVERTISEMENT

टीएमसीने गेल्या वर्षी जूनमध्ये One Man one Post हा उपक्रम सुरू केला होता. मग I-PAC कंपनीनेही त्याला मान्यता दिली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याचं कौतुक केलं होतं. पण नंतर कोलकाता नागरी निवडणुकीसाठी फिरहाद हकीम यांना तिकीट देण्यात आले तेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांना पाठिंबा दिला. अशा स्थितीत One Man one Postच्या दाव्याबाबत पक्षांतर्गत प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘2024 मध्ये भाजपचा पराभव शक्य आहे’, प्रशांत किशोर यांनी फॉर्म्युलाच सांगितला

I-PAC ने दिले स्पष्टीकरण

या वादावर I-PAC नेही आपली प्रतिक्रिया दिली होती. I-PAC ने म्हटले होते की, ते कोणत्याही नेत्याची डिजिटल मालमत्ता वापरत नाहीत. जो कोणी असे दावे करत आहे, त्याला एकतर जाणीव नाही किंवा तो खोटे बोलत आहे. त्याचवेळी, हे देखील ठळकपणे सांगितले गेले आहे की तयार केलेली सोशल मीडिया खाती बंगालच्या निवडणुकीपूर्वीच सक्रिय होती. नंतर सर्व पासवर्ड हे पक्षाकडे सुपूर्द करण्यात आले होते आणि प्रत्येक निर्णय पक्षाकडूनच घेतला जात होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT