Maharashtra Lok Sabha Election : महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका, तिकिटं का कापली?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोणत्या विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत?
महाराष्ट्रातील ९ खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra Updates : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची एक चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली होती, ती म्हणजे काही विद्ममान खासदारांची तिकिटे कापली जाणार. आता सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर कुणाचं तिकीट कापलं गेलं आणि कुणाला पुन्हा उमेदवारी मिळाली, हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात एक दोन नव्हे, तर तब्बल ९ खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहे. तर दोन खासदारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी नाकारण्यात आलेले हे खासदार कोण आणि त्यांना तिकीट का देण्यात आलं नाही, हे समजून घेऊयात... (Tickets of 9 sitting MPs from Maharashtra have been cut)

कोणत्या पक्षातील कोणत्या विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं नाही, हे आधी बघा...

तिकीट कापण्यात आलेल्या विद्ममान खासदारांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये आहे. भाजपने तब्बल सहा जणांचे तिकीट कापले आहे, तर एका विद्ममान खासदारांने प्रकृती बरी नसल्याने माघार घेतली आहे.

भाजपने तिकीट कापलेल्या खासदारांची नावे

1) पूनम महाजन
2) मनोज कोटक
3) गोपाळ शेट्टी
4) उन्मेष पाटील
5) प्रीतम मुंडे
6) जयसिद्धेश्वर स्वामी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांना यावेळी संधी नाकारली गेली. पूनम महाजन यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचा हवाला देत पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्षातीलच काहींची महाजन यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. कार्यकर्ते आणि मतदारसंघातील जनतेशी संपर्क नसल्याने त्यांना संधी दिली गेली नाही, अशी माहिती आहे.

हेही वाचा >> "काय वाटलं असेल, बाळासाहेबांच्या आत्म्याला?", फडणवीसांचा ठाकरेंवर प्रहार

गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचे तिकीट कापले जाणार, ही चर्चा आधीपासूनच सुरू होती. गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघातून भाजपने पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर मनोज कोटक खासदार असलेल्या उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली गेली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "मोदी दर आठवड्याला...", पवारांचं गंभीर विधान, आयोगाकडे बोट 

उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं गेलं. पक्षातंर्गत कलहाचा फटका उन्मेष पाटील यांना बसला. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही, त्याचबरोबर त्यांच्याविरोधात मतदारसंघात वातावरण होते. त्यामुळे सोलापूरमध्येही भाजपने उमेदवार बदलला. 

ADVERTISEMENT

प्रीतम मुंडे यांच्या जागेवरून लढणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणत होत्या. पण, पक्षाने त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यासाठी प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापण्यात आले. माधवं (माळी, धनगर, वंजारी) या रणनीतीचा भाग म्हणून त्यांना उतरवण्यात आले. प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांच्या मागे ओबीसींचा मोठा जनाधार आहे.  

शिवसेनेने तिकीट कापलेल्या विद्ममान खासदारांची नावे

1) कृपाल तुमाने
2) भावना गवळी
3) हेमंत पाटील

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. पण, त्यांच्या पदरी निराशाच आली. मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे आणि त्यांचा फटका निवडणुकीत बसू शकतो, असे अंतर्गत सर्वेक्षणात आढळून आल्याच्या आधारे त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >> माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस? 

सगळ्यात जास्त चर्चा झाली ती हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची. हेमंत पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती. पण, नंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आले. 

हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना यवतमाळव-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर कृपाल तुमाने यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड केली, पण त्यांनाही तिकीट मिळालं नाही. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली गेली. 

माघार घेतलेल्या विद्ममान खासदार कोण?

दोन खासदारांनी निवडणुकीतून स्वतःहून माघार घेतली. यात भाजपचे अकोलाचे खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती बरी नाही. दीर्घ काळापासून ते आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. 

त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढणार नाही, असे मी एकनाथ शिंदे यांना आधीच सांगितलं होतं, असे कीर्तिकर यांनी म्हटलेलं आहे. 

गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या मतदारसंघातून आता गोरेगाव पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT