Virar Fire: आगीतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्याकडून आर्थिक मदत जाहीर
मुंबई: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO)आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केलं आहे की, ‘विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना […]
ADVERTISEMENT
मुंबई: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत घोषित केली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO)आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केलं आहे की, ‘विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.’
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
मृत्यूचं तांडव… विरारमध्ये कोव्हिड हॉस्पिटलच्या ICU वॉर्डला आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू
हे वाचलं का?
पाहा विरार आगीच्या घटनेवर CMO ने नेमकी काय माहिती दिली:
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले.
ADVERTISEMENT
उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
Virar Fire: विरारमधील हॉस्पिटलला भीषण आग, मृतांची यादी आली समोर
पंतप्रधान मोदींनीही जाहीर केली मृतांच्या नातेवाईकांना मदत
दरम्यान, याच दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येक 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021
नेमकी घटना कशी घडली?
आज (23 एप्रिल) पहाटे विरारमधील (Virar) एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. (ICU Fire) ही आग एवढी भीषण होती की, त्यात तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू (13 Patients Death) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजेच्या सुमारास विरारमधील तिरुपती नगरच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमधील (Vijay Vallabh Hospital) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात अचानक आग लागली.
या आगीची माहिती मिळताच विरार अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी आगीचं स्वरुप अत्यंत भीषण असल्यानो अग्निशमन दलाच्या जवानांना ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही आग अटोक्यात आली.
पण दुर्दैवाने या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, इतर 5 ते 6 रुग्णांना वाचविण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आगीचं नेमकं कारण काय?
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किंटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट देखील झालं नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत अद्याप विरार महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच अग्निशमन दलाकडून आगीचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात येईल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT