प्रियांका चोप्रा घटस्फोट घेणार?; अभिनेत्रीने इन्स्टावरून हटवलं ‘जोनास’ आडनाव
बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत लोकप्रिय असलेलं कपल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याबद्दल बुचकळ्यात टाकणारी माहिती समोर आली आहे. सोमवारी (22 नोव्हेंबर) प्रियांका चोप्राने अचानक आपल्या इन्स्टा बायोबमध्ये बदल केला आहे. प्रियांकाने बायोमधून जोनास आडनाव हटवल्यानं घटस्फोटासह विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. निक जोनाससोबत विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियांका चोप्राने इन्स्टा बायोमधील नावात बदल केला […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत लोकप्रिय असलेलं कपल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याबद्दल बुचकळ्यात टाकणारी माहिती समोर आली आहे. सोमवारी (22 नोव्हेंबर) प्रियांका चोप्राने अचानक आपल्या इन्स्टा बायोबमध्ये बदल केला आहे. प्रियांकाने बायोमधून जोनास आडनाव हटवल्यानं घटस्फोटासह विविध शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
निक जोनाससोबत विवाहबद्ध झाल्यानंतर प्रियांका चोप्राने इन्स्टा बायोमधील नावात बदल केला होता. प्रियांका चोप्रा जोनास असा बदल तिने नावात केला होता. मात्र, अचानक बायोमध्ये बदल करत प्रियांकाने जोनास हे पतीकडील आडनाव काढून टाकलं आहे. इतकंच नाही तर प्रियांकाने स्वतःच आडनावही काढून टाकलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय झालं याबद्दल तर्कविर्तकांना उधाण आलं आहे.
प्रियांकाने इन्स्टा बायोमध्ये बदल केल्यानंतर प्रियांका आणि निक जोनासमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंकाही तिच्या काही चाहत्यांनी उपस्थित केली आहे. प्रियांका आणि निक घटस्फोट घेणार असल्याचंही काहींनी ट्वीट करून म्हटलं आहे.