अजानच्या वेळी लावता येणार नाही हनुमान चालीसा! नियम मोडल्यास थेट तुरुंगात
प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आता भोंग्यासंबंधी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धार्मिक प्रथा रीतिरिवाज यांचा विचार करता आणि विविध ठिकाणी धार्मिक तेढ वाढल्याने झालेले संघर्ष बघता काही महत्वाचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास थेट 4 महिने तुरुंगवास किंवा हद्दपारीची कारवाई होऊ […]
ADVERTISEMENT

प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आता भोंग्यासंबंधी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धार्मिक प्रथा रीतिरिवाज यांचा विचार करता आणि विविध ठिकाणी धार्मिक तेढ वाढल्याने झालेले संघर्ष बघता काही महत्वाचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास थेट 4 महिने तुरुंगवास किंवा हद्दपारीची कारवाई होऊ शकते. असंही पोलीस आदेशात म्हटलं आहे.
3 मे च्या आता सर्व धार्मिक ठिकाणच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. यामध्ये मुस्लिम धर्मीयांनाही देखील परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच नियमात असणाऱ्या आवाजाच्या मर्यादेतच भोंगे लावता येणार आहेत.
तसेच परवानगी घेतल्यास अजानच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी व नंतर हनुमान चालीसा यांचं पठण करता येणार नसल्याचं आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच हनुमान चालिसा पठण हे मशिदीपासून कमीत कमी 100 मीटर अंतरावर करावे लागणार आहे.
यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास 4 महिन्यापर्यंत कैद होऊ शकते. तर आवाजाच्या मर्यादेच्या नियमाचे उल्लंघन झाल्यास 2015 च्या कोर्ट निर्णयानुसार कारवाई होणार आहे.