Pubg Murder Case: प्रॉपर्टी डीलर माझ्या आईला भेटायला यायचा- आरोपी; बहिणीने सांगितला घटनाक्रम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लखनौ: लखनौ PUBG खून प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. १६ वर्षीय मुलाने आपल्या आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने तिची हत्या केली होती. मुलाची बालसुधार गृहात चौकशी चालू असताना त्याने नवीन खुलासे केले आहेत. संशयाची सुई वडीलांकडे जात असतानाच आणखी एक नाव समोर आले आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार, एक प्रॉपर्टी डीलर आईला भेटण्यासाठी घरी वारंवार येत असे, ज्यामुळे तो चिडायचा. 4 जून रोजी वडिलांच्या बंदुकीने आरोपी मुलाने आपल्या आईवरती गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले होते.

ADVERTISEMENT

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?

चौकशीदरम्यान, आरोपी मुलाने खुलासा केला की एक प्रॉपर्टी डीलर काका त्याच्या आईला भेटण्यासाठी वारंवार घरी येत असे. तो अनेकदा वडिलांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या घरी येत असे, ज्यामुळे आरोपीला त्याचा खूप राग यायचा.

हे वाचलं का?

मुलाने चौकशीदरम्यान उघड केले की एके दिवशी त्याने आपल्या वडिलांकडे याबद्दल तक्रार केली, त्यानंतर त्याचे वडील आणि आई यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याला मारहाण केली. तो म्हणाला, त्याची आईही अनेक दिवस घरापासूनही दूर राहायची.

“माझ्या घरी प्रॉपर्टी डीलरच्या वारंवार येण्याने नाराज होऊन, एका रात्री मी जेवण केले नाही, त्यानंतर माझ्या आईने माझा फोन हिसकावून घेतला आणि मला मारहाणही केली” असे आरोपीने सांगितले. त्यानंतर मी वडिलांशी या प्रकरणाविषयी बोलले तेव्हा त्यांनी सांगितले की “तुला जे वाटेल ते कर.”

ADVERTISEMENT

“काही दिवसांनंतर, माझ्या आईने काही पैसे हरवले, ज्यासाठी माझी चूक नसतानाही तिने मला मारहाण केली. त्या रात्री मी ठरवले की मी तिचा बदला घेतल्यानंतरच जेवन करेल. त्यानंतर आम्ही तिघेही झोपलेले असतानाच मी उठलो, पिस्तूल काढले आणि माझ्या आईला गोळ्या घातल्या.” असे आरोपी मुलाने सांगितले.

ADVERTISEMENT

”मी फाशिला सामोरे जायला तयार”

बालगृहातील एका कर्मचाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले की, “मुलगा जेव्हापासून इथे आले आहे, तेव्हापासून तो तोंडाला पाणी आणणारे पदार्थ मागत आहे. आणि या प्रकरणात पोलिसांच्या चुकीकडे बोट दाखवत आहे. तो म्हणला की आरोपीने आपल्या आईची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे आणि पोलिसांनी त्याला इथे पाठवून योग्य काम केले आहे.”

दंडाधिकाऱ्यांनी मुलाला विचारले, “तू तुझ्या आईला का मारलेस? तुला भीती वाटत नाही का?” मोठ्या आवाजात उत्तर देत ते आरोपी मुलगा म्हणाला, “मला भीती वाटत नाही. जास्तीत जास्त शिक्षा फाशीची असेल आणि मी त्याला सामोरे जाण्यास तयार आहे.” मुलाच्या जबाबाने न्यायदंडाधिकारी चिडले आणि अधिकाऱ्यांना रिमांड मागवून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यास सांगितले.

बहिणीने जबाबात सांगितले…

“रात्री उशिरा भैय्या घराबाहेर गेला होता तेव्हा मी शेजारच्या काकांच्या घराची बेल वाजवली होती मदत मागण्यासाठी, पण दरवाजा उघडला नाही. यामध्ये भावाने येऊन मला शिवीगाळ करून शौचालयात कोंडले.”

मुलीने सांगितले की, थोड्या वेळाने तिच्या भावाने मॅगी बनवली आणि खाऊ घातली आणि सांगितले की तू गप्प राहशील तर तू जिवंत राहशील. मुलाने बहिणीला सांगितले की एक इलेक्ट्रिशियन काका आला आणि आईला मारून निघून गेला. त्याचवेळी शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीने सांगितले की, जेव्हा ते हत्येनंतर घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की बहीण आणि भाऊ दोघेही मोठ्याने रडत आहेत.

आईला इलेक्ट्रीशियन काकांनी मारले आहे. मुलाने आईचा मृतदेह आणि पिस्तूलही शेजाऱ्याला दाखवले होते. त्यानंतर शेजाऱ्याने दोन्ही मुलांना आपल्या घरी नेले. आईला इलेक्ट्रिशियन काकांनी मारल्याचे त्या मुलाने तेथील संपूर्ण घराला सांगितले आणि ते मोठ्याने रडू लागले.

संशयाची सुई वडीलांकडेही

मुलगा पाच तारखेपासून बालसुधार गृहात आहे. बालसुधार गृहातील एक काका माझ्या वडीलांचे मित्र आहेत, ते माझ्या वडीलांना फोन लावून देतात, आणि मग पप्पा मला सगळे सांगत असतात. यानंतर मुलाला आपल्या आईची हत्या कर असे वडीलांनीच उकसवले असल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. परंतु पोलीस अजून अंतीम तपासापर्यंत पोहोचलेले नाहीत त्यामुळे आता खरा आरोपी कोण हे लवकरच समोर येईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT