Pune Crime : बंदुकीचा धाक अन् महिलेला खाऊ घातली स्मशानातील हाडांची पावडर
Pune crime news latest। अविवाहित महिलांचा (Married woman) सासरच्या मंडळीकडून वेगवेगळ्या प्रकारे छळ झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण पुण्यात (Pune) जे घडलंय ते ऐकून तुम्ही हादरून जालं. मूल होत नाही, तसेच घराची आर्थिक प्रगती होत नसल्यानं जाळलेल्या माणसांच्या हाडांची पावडर खायला दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी कुटुंबियांविरुद्ध सिंहगड […]
ADVERTISEMENT
Pune crime news latest। अविवाहित महिलांचा (Married woman) सासरच्या मंडळीकडून वेगवेगळ्या प्रकारे छळ झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण पुण्यात (Pune) जे घडलंय ते ऐकून तुम्ही हादरून जालं. मूल होत नाही, तसेच घराची आर्थिक प्रगती होत नसल्यानं जाळलेल्या माणसांच्या हाडांची पावडर खायला दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी कुटुंबियांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (sinhgad police station, pune) गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
तक्रारदार महिला कॉम्प्युटर इंजिनिअर असून, एप्रिल 2019 मध्ये महिलेचं जयेश पोकळे याच्यासोबत लग्न झाल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ करण्यास सुरूवात केली. सासरच्या लोकांनी जयेशला सोन्याचे दागिने आणि गाडी घेण्यासाठी 10 लाख रुपये मागितले होते. मात्र, ते न दिल्यानं छळ सुरू केला.
काही दिवसांनंतर महिलेच्या घरी वाद सुरू झाले. घराची आर्थिक प्रगती व्हावी आणि मूल होत नाही म्हणून पोकळे कुटुंबियांनी अमावस्येला अघोरी कृत्य सुरू केलं. एका अमावस्येला रात्रीच्या वेळी दीर, जाऊ, पती व सासू-सासऱ्यांनी महिलेला स्मशानभूमीत नेलं.
हे वाचलं का?
तिथे जाळलेल्या प्रेताची काही हाड गोळा केली. राख मडक्यात भरली. त्यानंतर स्मशानभूमीतून आणलेली राख महिलेला पाण्यात टाकून प्यायला दिली. नंतर 11 फेब्रुवारी 2021 रोजी अमावस्येच्या दिवशी पूजा असल्याचं सांगून विवाहित महिलेला सासरचे लोक निगडी येथे घेऊन गेले.
मृत माणसांची हाडं, घुबडाचे पाय, मृत माणसाचे केस… भयंकर छळ
मृत माणसाचे केस, हाडं, घुबडाचे पाय व कोंबड्याचं मुंडकं याची मांत्रिक महिलेने पूजा केली. तिथे विवाहितेला बसवण्यात आलं. जाळलेल्या माणसाच्या हाडांची पावडर करून मांत्रिक महिलेने विवाहितेला खायला सांगितली. त्याला महिलेने नकार दिला. त्यानंतर दीपक जाधव याने पिस्तूल काढून महिलेच्या डोक्याला लावली आणि पावडर खायला लावली.
ADVERTISEMENT
फेबु्वारी २०२१ मध्ये तिला सासरकडील लोकांनी जावेबरोबर तिच्या आईवडिलांच्या कोकणातील एका पुजेसाठी पाठविले होते. तेथे मध्यरात्री एका धबधब्याखाली आंघोळ करायला लावली. त्यावेळी तिच्या जावेने मांत्रिक महिलेशी व्हॉटसअॅप कॉलवर मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे जावेच्या आईवडिलांनी तिला अघोरी कृत्य करायला लावले. हा प्रकार तिने पतीला सांगितला. तेव्हा त्याने आम्ही गुंड लोक आहोत, हे कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाचा मुडदा पाडू अशी धमकी दिली.
ADVERTISEMENT
पुढे ऑक्टोबर 2021 मध्ये विवाहित महिलेच्या पतीला क्रेटा गाडी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी 8 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही अर्धा हिस्सा देण्याची मागणी सासरची मंडळी करत होती आणि विवाहितेचा छळ करत होती. मूल होत नाही आणि आई वडिलांनी पैसे देणं बंद केल्यामुळे विवाहितेला 26 मे 2022 रोजी घरातून हाकलून दिलं. विवाहितेनं नंतर पुन्हा नांदण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला मात्र घरात घेतलं नाही. त्यानंतर विवाहितेनं पोलिसांत फिर्याद दिली.
महिलेचा छळ : आरोपी कोण?
याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयस पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णू पोकळे (रा. राधाकृष्ण व्हिला, पोकळे पॅराडाईज, धायरी), दीपक जाधव आणि बबिता उर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT