‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणारे 24 तासांत तुरुंगातून बाहेर? किरकोळ कलम लावल्याचा आरोप

मुंबई तक

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी काही संबंधितांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर शनिवारी पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. घोषणाबाजी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून, याच व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पुणे पोलिसांकडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी काही संबंधितांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर शनिवारी पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. घोषणाबाजी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून, याच व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

यावर, पुणे पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. ही घटना आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. याशिवाय यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली.

मात्र या प्रकरणातील संशयित 24 तासांत बाहेर आल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी किरकोळ कलमं लावल्यानेच त्यातील आरोपींची शनिवारी न्यायालयातुन मुक्तता झाली असा आरोप एल्गार परिषदेतील तक्रारदार तुषार दामुगडे यांनी केला आहे. तुषार दामुगडे यांनी 31 डिसेंबर 2017 ला पुणातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेमध्ये देश विघातक कृत्य शिजत होत असे आरोप करुन तक्रार दाखल केली होती.

दामुगडे यांनी आताही एनआयए आणि एटीएस विरोधात चिथावणी देणाऱ्या आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देणाऱ्यांवर UAPA व देशद्रोहाचे कलम लावावे, असे निवेदन बंडगार्डन पोलीस स्थानकात दिले आहे.

हे वाचलं का?