नेपाळमधल्या सुप्रसिद्ध पबमध्ये राहुल गांधींची पार्टी, व्हायरल व्हीडिओवर भाजप आक्रमक
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा आहे. राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओत ते काठमांडूच्या नाईट क्लबमध्ये आल्याचं दिसतं आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर कडाडून टीका होते आहे. Rahul Gandhi seen at nightclub in viral video […]
ADVERTISEMENT
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा आहे. राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओत ते काठमांडूच्या नाईट क्लबमध्ये आल्याचं दिसतं आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर कडाडून टीका होते आहे.
ADVERTISEMENT
Rahul Gandhi seen at nightclub in viral video
Read @ANI Story | https://t.co/V9gLQc7lgd#RahulGandhi #Congress #ViralVideo pic.twitter.com/p0aM5PDHKU
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2022
भाजपचे शहाजद पूनावाला यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी काय करत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसा होते आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. राजस्थान पेटलं आहे. राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भारतातले लोक समस्यांमध्ये होरपळत असताना राहुल गांधी पार्टी कशी काय करू शकतात? असंही भाजपने राहुल गांधींना विचारण्यास सुरूवात केली आहे.
पूनावाला पुढे म्हणतात काँग्रेस पार्टी आता संपल्यात जमा आहे. मात्र राहुल गांधींची पार्टी सुरू आहे. राजकारणाबाबत ते गंभीर नाहीत. जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत बसले आहेत.
हे वाचलं का?
BJP slams Rahul Gandhi’s visit to Kathmandu nightclub, here are a few reactions. #ITVideo #RahulGandhi | @snehamordani pic.twitter.com/OUnuWJNlIL
— IndiaToday (@IndiaToday) May 3, 2022
यानंतर किरण रिजिजू यांनी राहुल गांधी यांचा व्हीडिओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.राहुल गांधी यांचं सुट्टी घेणं, पार्टी करणं, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन ट्रिप हे देशाला आता नवं नाही असंही रिजिजू यांनी म्हटलं आहे.
भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल गांधींचा व्हीडिओ ट्विट केला आहे आणि म्हटलं आहे की जेव्हा मुंबईला वेठीला धरलं जात होतं तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्ये आहेत. जेव्हा त्यांच्या पक्षात एक एक स्फोट पाहण्यास मिळत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. आश्चर्याची बाब ही आहे की काँग्रेस पक्षाने बाहेरच्या व्यक्तीला (गांधी घराणं सोडून) अध्यक्षपद सोपवण्यास नकार दिला असताना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला फटका बसतो आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्हीडिओत?
ADVERTISEMENT
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे नाईट क्लबमध्ये त्यांच्या मैत्रिणीसोबत दिसत आहेत. इतर लोक डान्स करत आहेत आणि राहुल गांधी पार्टी करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT