प्रबोधनकारांना मध्ये आणू नका, तुम्हालाही परवडणार नाही; राज ठाकरेंचा शरद पवारांवर पलटवार

मुंबई तक

महाराष्ट्रात जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमने-सामने आल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचण्याचा सल्ला दिला. त्यावरून राज ठाकरे यांनी पवारांना उलट सवाल केला आहे. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकारांच्या लिखाणाशी काय संबंध, हे मला पवारांनी समजून सांगावं, असा सवाल राज ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आमने-सामने आल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण वाचण्याचा सल्ला दिला. त्यावरून राज ठाकरे यांनी पवारांना उलट सवाल केला आहे. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकारांच्या लिखाणाशी काय संबंध, हे मला पवारांनी समजून सांगावं, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर असून, दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले,’मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत. मी जे बोललो, त्याचा प्रबोधनकारांच्या लिखाणाशी काय संबंध हे मला शरद पवारांनी समजून सांगावं. स्वातंत्र्याची ७५ वर्ष या संदर्भाने ती मुलाखत होती. त्यात अनेक लोक होती’, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

‘आपल्याकडे मॉल्स आले, हातात मोबाईल आले, चांगल्या काही गोष्टी आल्या. पण वैचारिक दृष्ट्या सुधारलो का? असा प्रश्न होता. त्या अंगानेच मी बोललो. अजूनही आपण जातीपातीत अडकलेलो आहोत. अजूनही निवडणुकीत रस्ते, पाणी देऊ हेच सांगितलं जातं. मग आपण ७४ वर्षात काय मिळवलं, हे शोधणं आवश्यक आहे, असं मला वाटतं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp