राज्यसभेसाठी २४ वर्षानंतर मतदान; १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार कसा पडला होता?
राज्यात सहा जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीने सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. सहाव्या जागेवर भाजप आणि शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं आता नेमकं बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपने फेटाळल्याने आता राज्यसभेसाठी मतदान होणार असून, तब्बल २४ वर्षांनंतर हे घडतंय. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा १९९८ च्या राज्यसभा निवडणुकीची चर्चा होऊ लागलीये. महाराष्ट्रात […]
ADVERTISEMENT

राज्यात सहा जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीने सर्वांचीच उत्कंठा वाढवली आहे. सहाव्या जागेवर भाजप आणि शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं आता नेमकं बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपने फेटाळल्याने आता राज्यसभेसाठी मतदान होणार असून, तब्बल २४ वर्षांनंतर हे घडतंय. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा १९९८ च्या राज्यसभा निवडणुकीची चर्चा होऊ लागलीये.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होतेय. काँग्रेसने इम्रान प्रतापगढींना उमेदवारी दिलीये. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेलांना, तर शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार यांना रिंगणात उतरवलंय. भाजपकडून आधी पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी देण्यात आलीये.
राज्यसभा निवडणूक: ‘वर्षा’वरच्या बैठकीतील Inside स्टोरी, मुख्यमंत्र्यांनी आखली रणनिती!
सहाव्या जागेवर महाडिकांना उमेदवारी दिल्यानंतर राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली. आता निवडणुकीत मतदान होणार हे स्पष्ट झालं असून, यानिमित्ताने १९९८ मध्ये झालेली राज्यसभा निवडणूक चर्चेत आली आहे.
