Rajyasabha Election: महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या दारात, नवा ट्विस्ट येणार?
Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेले आहेत. कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार का? याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]
ADVERTISEMENT

Mahavikas Aghadi महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेले आहेत. कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार का? याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित आहेत. या सगळ्या चर्चेतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून जी धुसफूस सुरू होती त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांचं देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाणं हे सूचक मानलं जातं आहे. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतलं आहे का? अशाही चर्चा आता रंगल्या आहेत. समझोता करण्यासाठी प्रस्ताव घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर गेले आहेत. अनिल देसाई, छगन भुजबळ, सतेज पाटील आणि सुनील केदार हे राज्य सरकारमधले महत्त्वाचे नेते फडणवीसांना भेटायला गेले आहेत.
सहावी जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात घोडेबाजार, म्हणजेच आमदारांच्या खरेदी-विक्रीचं राजकारण होऊ शकतं. त्या घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठीची ही सुरूवात आहे असं म्हणता येईल.
अनिल देसाई, छगन भुजबळ, सुनील केदार या सगळ्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यायची ठरवली का? ही सगळी माहिती अद्याप समोर आलेली नाही. भाजपचे नेते धनंजय महाडिक हे निवडणुकीतून माघार घेणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
