Rashid Khan चा परिवार अडकला अफगाणिस्तानात, Taliban चा राजधानी काबुलवर ताबा
तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली आहे. राजधानी काबूलवर तालिबानी फौजांनी ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घानी यांनी पलायन केलं आहे. काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे. परंतू देशात अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव मात्र या सत्तांतरानंतर टांगणीला लागला आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानचा परिवारही यावेळी देशात अडकला असून…द हंड्रेडच्या […]
ADVERTISEMENT
तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात सत्तांतर घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली आहे. राजधानी काबूलवर तालिबानी फौजांनी ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घानी यांनी पलायन केलं आहे. काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली आहे. परंतू देशात अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव मात्र या सत्तांतरानंतर टांगणीला लागला आहे.
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानचा परिवारही यावेळी देशात अडकला असून…द हंड्रेडच्या लिगमध्ये सहभागी झालेल्या राशिदला सतत आपल्या परिवाराची चिंता सतावते आहे.
राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान हे तीन अफगाणिस्तानचे खेळाडू हंड्रेड ही लिग संपल्यानंतरही काही काळ इंग्लंडमध्येच राहणार आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसनने राशिद खान सध्या कोणत्या मनस्थितीतून जात आहे याबद्दल माहिती दिली.
हे वाचलं का?
अफगाणिस्तानात सध्या खूप काही घडतंय. सामन्यादरम्यान राशिद बाऊंड्री लाईनवर उभा असताना मी त्याच्याशी बोललो. तो खूप चिंतेत होता. राशिद आपल्या परिवाराला देशातून बाहेर काढू शकला नाहीये. त्यांच्यासाठी सध्या सगळंच बिनसलं आहे. परंतू असं असतानाही हे खेळाडू चांगली कामगिरी करतायत. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
केविन पिटरसर – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू
राशिद, नबी आणि मुजीब या तीन खेळाडूंचा अपवाद वगळता बाकीचे सर्व खेळाडू हे सध्या अफगाणिस्तानातच आहे. अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युएईत वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. परंतू या मालिकेचं आयोजन आता श्रीलंकेत होणार आहे. श्रीलंकन सरकारने हम्बनटोटा येथे ही मालिका खेळवण्याची परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT
सत्तांतरानंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य आता धोक्यात आहे. खासकरुन तेव्हा ज्यावेळी टी-२० वर्ल्डकप हा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तालिबानच्या हातात सत्ता आल्यामुळे…त्यांचा इतिहास पाहता खेळाडूंना मैदानात सरावासाठी सोयी-सुविधा आणि मोकळं वातावरण मिळेल याची शाश्वती नाहीये. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ तयारी कशी करणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
ADVERTISEMENT
Taliban च्या राजवटीत काय असेल अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT