इतिहासातील आणखी एक योद्धा येणार रुपेरी पडद्यावर; ‘रावरंभा’ उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या मराठीसृष्टीत इतिहासावर आधारित अनेक सिनेमे तयार होतायत. यातून शिवकालातील कथानक रुपेरी पडद्यावर पहायला मिळतात. अशातच आता अजून एका सिनेमाची भर पडणार आहे. लवकरचं ‘रावरंभा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ADVERTISEMENT

अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. रावरंभातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे “रावरंभा” – द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४. या चित्रपटाची निर्मिती करतायत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच “रावरंभा” या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT