मुंबईतील खार येथील इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू, दोन महिलांना सुखरुप बाहेर काढलं
मुंबईतील खार भागात निवासी इमारतीमधील एका खोलीत लागलेल्या आगीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या खोलीत आग लागली तिकडे तीन महिला अडकल्या होत्या, त्यापैकी दोन महिलांना सुखरुप वाचवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुतन व्हिला या सोसायटीच्या विजेच्या मिटरबॉक्समध्ये सर्वात पहिल्यांदा आग लागली. यानंतर […]
ADVERTISEMENT
मुंबईतील खार भागात निवासी इमारतीमधील एका खोलीत लागलेल्या आगीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या खोलीत आग लागली तिकडे तीन महिला अडकल्या होत्या, त्यापैकी दोन महिलांना सुखरुप वाचवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नुतन व्हिला या सोसायटीच्या विजेच्या मिटरबॉक्समध्ये सर्वात पहिल्यांदा आग लागली. यानंतर आगीमुळे निर्माण झालेला धूर संपूर्ण इमारतीत पसरला. यावेळी एका खोलीत अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
संगीता ठाकूर, पलक जगवानी, हेमा जगवानी या महिलांना अग्नीशमन दलाने बाहेर काढलं. त्यापैकी हेमा जगवानी यांची तब्येत धुरामुळे खालावली होती. परंतू हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं होतं,
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT