Russia-Ukraine war : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना फोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजधानी कीवचा ताबा मिळवण्यासाठी रशियाकडून सलग तिसऱ्या दिवशीही हवाई हल्ले सुरूच असून, युक्रेनकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. एकीकडे रशियन लष्कराशी लढत असतानाच युक्रेनकडून जगभरातून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्वीट करून दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यांना रशियाच्या हल्ल्याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर 100,000 पेक्षा जास्त हल्लेखोर युक्रेनच्या जमीन आलेले आहे आणि रहिवाशी इमारतींवर अंदाधुंद गोळीबार करत आहेत.”

हे वाचलं का?

“आम्ही भारताला विनंती करतो की आम्हाला त्यांनी सुरक्षा परिषदेमध्ये राजकीय पाठिंबा द्यावा. आक्रमकाला सोबत मिळून रोखूया”, असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“रशियाचा ‘तो’ कट युक्रेननं उधळला”; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा

ADVERTISEMENT

याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडूनही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी तेथील परिस्थितीची माहिती दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात झालेल्या जीवित व वित्त हानी बद्दल पंतप्रधान मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केलं असल्याचं पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ संघर्ष थांबवून चर्चेसाठी पुढे येण्याच्या आवाहनाचा पुर्नरुल्लेख केला. शांतता निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नात भारत सहभागी होण्यास इच्छुक असल्याचंही सांगितलं.

Russia – Ukraine वादामुळे भारतातील Stock Market वर अजून किती परिणाम होणार?

या चर्चेवेळी पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल भारताची चिंता व्यक्त केली. अडकलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी मदत करावी, अशी मागणी मोदींनी यावेळी केली.

यापूर्वी रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील हिंसा थांबवण्याचं आवाहन पुतिन यांना केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT