रिहानाच्या ट्विटनंतर सचिन का होतोय ट्रोल?
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण आलं, त्यानंतर सरकारकडून दिल्ली बॉर्डरवरची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीनेही या संदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता अक्षय […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण आलं, त्यानंतर सरकारकडून दिल्ली बॉर्डरवरची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीनेही या संदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता अक्षय कुमार या सारख्या अनेकांनी ट्विट करत भारताचं अखंडत्व अबाधित राहायला हवं, असं म्हटलं. पण त्यानंतर आता ट्विट करणा-या सेलिब्रिटीजवर मुख्य म्हणजे सचिन तेंडूलकरवर नेटकरींकडून टीका केल्या जात आहेत.
पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यावर अनेकांनी त्यावर आपली मतं मांडली, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही त्यावर ट्विट केलं. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda, असं ट्विट त्याने केलं. पण त्याच्या या ट्विटनंतर त्याच्यावर आता चहूबाजूंनी टिका व्हायला लागल्या आहेत.
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
कधीही कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य न करणा-या सचिनने, अगदी क्रिकेटमधल्या वादाच्या मुद्द्यांवरही मुग गिळून गप्प बसणा-या सचिनने, खासदार असतानाही तोंडातून शब्दही न काढणा-या सचिनने आता अचानक याविषयावर ट्विट कसं केलं असा सवाल नेटकरींकडून केला जातोय.
काही जणं त्याच्यावर राजकारणाचा बळी पडल्याचा आरोप लावतायत, तर काहींनी तर अर्जुनला इंडियन क्रिकेट टीममध्ये स्थान मिळावं म्हणनू सचिनने सरकारची चमचेगिरी केल्याचा आरोप लावलाय.