Sachin Vaze यांनी २५ फेब्रुवारीला घातलेला कुर्ता रॉकेल ओतून जाळला, NIA च्या सूत्रांची माहिती
सचिन वाझे यांनी २५ फेब्रुवारी या तारखेला दोन कुर्ते सोबत घेतले होते. त्यातला एक कुर्ता त्यांनी रॉकेल ओतून मुलुंड टोल नाका ओलांडल्यानंतर जाळून टाकला अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे हे कुर्ता घालून आणि डोक्याला रूमाल बांधून फिरत होते असं दिसलं आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ते […]
ADVERTISEMENT
सचिन वाझे यांनी २५ फेब्रुवारी या तारखेला दोन कुर्ते सोबत घेतले होते. त्यातला एक कुर्ता त्यांनी रॉकेल ओतून मुलुंड टोल नाका ओलांडल्यानंतर जाळून टाकला अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे हे कुर्ता घालून आणि डोक्याला रूमाल बांधून फिरत होते असं दिसलं आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ते वास्तव्य करत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाऊन तिथले काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
ADVERTISEMENT
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांच्या घरातून आणि कारमधून अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सचिन वाझे यांनी २५ तारखेच्या रात्री दोन कुर्ते सोबत बाळगले होते. त्यातला एक कुर्ता त्यांच्या घरी मिळाला आहे. जो एनआयएने ताब्यात घेतला आहे. दुसरा कुर्ता त्यांनी मुलुंड टोल नाका क्रॉस केल्यानंतर रॉकेल ओतून जाळला असल्याचंही NIA च्या सूत्रांनी म्हटलं आहे.
सचिन वाझे यांनीच ‘त्या’ स्कॉर्पिओचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केले?
हे वाचलं का?
सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस
NIA ने अँटेलिया प्रकरणात आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. एएनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्तीही मुंबई पोलीस दलातलीच आहे. सचिन वाझेंची नियुक्ती CIU मध्ये करण्यात आली होती. नियमानुसार त्यांनी गुन्हे शाखेच्या डिसीपींना रिपोर्ट करणं गरजेचं होतं किंवा गुन्हे शाखेच्या सह आयुक्तांना रिपोर्ट करणं गरजेचं होतं. मात्र सचिन वाझे हे थेट पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते.
ADVERTISEMENT
काय घडलं होतं २५ फेब्रुवारीला?
ADVERTISEMENT
२५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेरील रस्त्यावर एक स्कॉर्पिओ पार्क केलेली आढळून आली. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ सापडल्यानंतर पोलिसांना संशय आल्याने या स्कॉर्पिओची तपासणी फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब शोधक पथकातर्फे करण्यात आली. तेव्हा या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. सुरूवातीला यामागे दहशतवादी संघटना आहे का? किंवा घातपाताची काही शक्यता आहे का? हे तपासण्यात आलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काय आरोप केले?
मार्च महिन्यात जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलिया प्रकरणात आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचे आरोप केले. तसंच मनसुख हिरेन प्रकरणही त्यांनी बाहेर काढलं. सचिन वाझे यांना वाचवलं जात असल्याचा आरोप सरकारवर केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT