Saif Ali Khan : चाकू हल्ल्यातून सावरलेल्या सैफला पुन्हा एक धक्का, 15 हजार कोटींची प्रॉपर्टी जप्त होणार?

मुंबई तक

केंद्र सरकार Enemy Property Act 1968  अंतर्गत भोपाळमधील सैफ अली खानची मालमत्ता जप्त करू शकतं. पण हा कायदा काय आहे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खानची संपत्ती जप्त होणार?

point

पतौडींच्या 15 कोटींच्या मालमत्तेचा विषय काय?

point

काय आहे Enemy Property Act?

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला नुकताच जीवघेणा हल्ला झाला होता. या धक्क्यातून तो सावरतो न सावरतो तोच त्याला आता अजून एक धक्का बसला आहे. सैफच्या पतौडी कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता लवकरच केंद्र सरकार ताब्यात घेऊ शकतं. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही संपत्ती आहे. या संपत्तीची अंदाजे किंमत तब्बल 15 हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेला स्थगिती आदेश रद्द केला आहे.

उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश केला रद्द

चाकू हल्ल्यात जखमी झालेला सैफ उपचारानंतर मंगळवारी घरी परतला. त्याला सध्या आराम करायला सांगितलेला असून, यादरम्यानच त्याला हा धक्का बसला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. केंद्र सरकार बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या भोपाळ आणि रायसेन येथील पतौडी कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्ता ताब्यात घेऊ शकतं. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने यावरील स्थगिती आदेश उठवला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकार Enemy Property Act 1968 अंतर्गत या मालमत्तेचं अधिग्रहण करू शकतं.

Enemy Property Act म्हणजे काय?

केंद्र सरकार Enemy Property Act 1968  अंतर्गत भोपाळमधील सैफ अली खानची मालमत्ता जप्त करू शकतं. पण हा कायदा काय आहे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. Enemy Property Act 1968  अंतर्गत भारत सरकार 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या मालमत्तेवर दावा करू शकतं. सैफ अली खानच्या पतौडी कुटुंबाच्या भोपाळमधील मालमत्ता देखील या श्रेणीत येतात.




 

हे वाचलं का?

    follow whatsapp