समीर वानखेडेंची जात पडताळणी झालीच नाही, माहिती अधिकारात समोर आली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती

ADVERTISEMENT

ऑक्टोबर महिन्यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता मुंबई जात पडताळणी समिती कार्यालयात समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने कोणतीही पडताळणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा गुगल, फेसबुक आणि ट्विटरविरोधात दावा

हे वाचलं का?

यासंदर्भात बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात मुंबई जात पडताळणी समितीकडे समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने जात पडताळणी प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे काय..? प्रमाणपत्र दिले असल्यास सोबत जोडलेली कागदपत्रे मिळावी यासाठी माहिती मागवली होती. त्यावर मुंबई शहरातल्या जिल्हा जात पडताळणी समितीचा सचिव सुनीता मते यांनी समीर वानखेडे या नावाने कोणतीही जात पडताळणी त्यांच्या कार्यालयाकडून झाली नसल्याची माहिती यादव यांना प्राप्त झाली आहे.

ADVERTISEMENT

महिनाभरापासून जात पडताळणीच्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईत जात पडताळणीच्या झाली नाहीतर नोकरीत येताना कोणती कागदपत्रे सादर केली, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ADVERTISEMENT

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारला आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्यानंतर 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही संपूर्ण कारवाई म्हणजे बनाव असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी सुमारे एक ते दीड महिना रोज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर विविध आरोप केले. त्यापैकी एक आरोप हादेखील होता की समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रं सादर करून सरकारी नोकरी मिळवली. एवढंच नाही तर नवाब मलिक यांनी त्यांच्या पहिल्या निकाहचे फोटोही पोस्ट केले होते, ज्यावरून एकच खळबळ उडाली होती.

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे असा हा सामना चांगलाच रंगला होता. हे प्रकरण कोर्टात गेलं. तिथे कोर्टाने नवाब मलिक यांना सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यापासून आणि जाहीर वक्तव्य करण्यापासून रोखलं आहे. अशात आता ही नवी माहिती समोर आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही माहिती समोर आल्याने सभागृहात नवाब मलिक हा मुद्दा उपस्थित करू शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT