Jitendra Navlani: शिवसेनेला धक्का! ईडी अधिकाऱ्यांविरोधातल्या एसीबीच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती
व्यावसायिक जितेंद्र नवलानींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला बॉम्बे हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची आणि तूर्त तपासाला स्थगिती देण्याची मागणी ईडीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. त्यावर बुधवारी झालेल्या न्या. मिलिंद जाधव आमि […]
ADVERTISEMENT
व्यावसायिक जितेंद्र नवलानींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला बॉम्बे हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
ADVERTISEMENT
या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची आणि तूर्त तपासाला स्थगिती देण्याची मागणी ईडीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. त्यावर बुधवारी झालेल्या न्या. मिलिंद जाधव आमि न्या. अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
हे वाचलं का?
काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून जितेंद्र नवलानी खंडणी उकळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एसीबीने ५ मे रोजी जितेंद्र नवलानीविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश नव्हता. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावं अशी मागणी केली. ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देऊन नवलानीने व्यावसायिकाकडून ५८ लाख रूपये घेतले असा आरोप एसीबीने केला आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्र नवलानी कुठे आहे? उद्धव ठाकरे उत्तर द्या-किरीट सोमय्यांची मागणी
ADVERTISEMENT
मात्र या सगळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आता कोर्टाने एक प्रकारे शिवसेनेला धक्का दिला आहे. कारण या प्रकरणाची चौकशी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राऊतांनी फ्रंटमॅन म्हणून उल्लेख केलेले नवलानी याआधी आलेत IT विभागाच्या रडारवर –
२०२१ मध्ये जितेंद्र नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका पुरी हे आयकर विभागाच्या रडारवर आले होते. जितेंद्र नवलानी आणि त्यांच्या पत्नीची Bonanza Fashion Merchants Pvt Ltd. नावाची एक कंपनी आहे. परंतू आयकर विभागाच्या चौकशीत ही कंपनी Shell कंपनी असल्याचं समोर आलं होतं. या कंपनीचा कोणताही बिजनेस नसून पुण्यातील एका प्लॅटमध्ये राहणारा व्यक्ती या कंपनीचा मालक दाखवण्यात आला होता. आयकर विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्यांना, या कंपनीचा उत्पन्नाचा एकही स्त्रोत दिसून आला नाही.
या कंपनीच्या संचालक पदावर नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका पुरी यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेक बोगस कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आलेल्या रकमेतून Bonanza Fashion Merchants Pvt Ltd. कंपनीचा व्यवहार झाल्याचं आयकर विभागाच्या चौकशीत समोर आलं होतं.
हा सर्व आर्थिक व्यवहार जितेंद्र नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका पुरी यांच्या फायद्यासाठी करण्यात आला होता. हवाला ऑपरेटर शिरीष शहाच्या माध्यमातून नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका पुरी यांनी या हा सर्व व्यवहार केल्याचा आयकर विभागाचा आरोप होता. २०१४-१५ सालात या कंपनीने उत्पन्नाचा कोणताही स्थिर स्त्रोत नसताना एक फ्लॅट खरेदी केल्याचंही समोर आलं होतं.
आयकर विभागाने या प्रकरणात हवाला ऑपरेटर शिरीष शहाचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. ज्यात शिरीष शहाने आपणच जितेंद्र नवलानीला कंपनीच्या नावावर बेनामी प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी मदत केल्याचं मान्य केलं होतं. या प्रकरणासोबतच जितेंद्र नवलानी याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशीही जवळचे संबंध असल्याचं समोर आलं होतं.
जितेंद्र नवलानी हे मुंबईत लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले होते. पोलीस अधिकारी डांगे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, नवलानी यांना ब्रीच कँडी रुग्णालयासमोर पब चालवण्यासाठी मनाई केल्यामुळे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT