सांगली: पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं काय सुरु?, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार

मुंबई तक

स्वाती चिखलीकर, सांगली: आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची घटना सांगलीत घडली होती. आता याच प्रकरणी नंदिवाले समाजातील जातपंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस स्टेशन येथे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. नंदिवाले समाजातील काही जातपंचांनी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे जातपंचायत 9 जानेवारी 2022 रोजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली: आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची घटना सांगलीत घडली होती. आता याच प्रकरणी नंदिवाले समाजातील जातपंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस स्टेशन येथे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

नंदिवाले समाजातील काही जातपंचांनी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे जातपंचायत 9 जानेवारी 2022 रोजी बसविली होती. या जातपंचायतमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते.

पलूस येथील झालेला हा जातपंचायतीचा निर्णय ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्या’नुसार गुन्हा आहे. म्हणून इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला 14 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला.

यामध्ये जातपंचायतीचे पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार, शामराव देशमुख, अशोक भोसले, किसन रामा इंगवले आणि विलास मोकाशी या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp