गुंड गजा मारणेची भीती घालून पैसे उकळणाऱ्या सावकाराला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुंड गजा मारणेच्या नावाची भीती घालून अवैधरित्या सावकारी करणाऱ्या एका इसमाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण थोरात असं या सावकाराचं नाव असून, थोरातने आपल्या पैशांची वसुली करण्यासाठी तक्रारदार मोहन किनगेची आर्थिक पिळवणूक सुरु केली होती.

ADVERTISEMENT

दारु अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

२०१९ मध्ये प्रवीण थोरात याने दहा टक्क्याच्या व्याजाने किनगे यांना ४० हजार रुपये दिले होते. यानंतर सलग दोन वर्ष किनगे फोन-पे आणि गूगल-पे च्या माध्यमातून प्रवीण थोरात यांना व्याजासकट पैसे देत होते. परंतू दोन वर्षात पूर्ण रक्कम दिल्यानंतरही प्रवीण थोरात किनगे यांच्याकडे तगादा लावला.

हे वाचलं का?

दुर्दैवी! पती-पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

यानंतर सावकार प्रवीण थोरातने किनगे यांना फोनवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकवायला सुरुवात केली. प्रवीण थोरातने किनगे यांना त्यांच्यात घरात डांबून ठेवत, तुला माहिती आहे का गजा मारणे कोण आहे? त्याची मिरवणूक आम्हीच काढली होती. शितोळेचे दोन्ही हात आम्हीच तोडले होते, आम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझ्यासोबतही असंच करु.”

ADVERTISEMENT

थोरातकडून पैशांसाठी तगादा वाढल्यानंतर किनगे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी सावकार प्रवीण थोरातला अटक केली आहे. थोरातने अशा पद्धतीने आणकी किती जणांना पैसे दिले असून अशा पद्धतीने वसूली केली आहे याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT