“संजय राऊत महागद्दार,26 मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर…”, दादा भुसेंचा विधानसभेत चढला पारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Dada Bhuse Criticize Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) याच्यावर गंभीर आरोप करणारे ट्विट केले होते.तसेच या प्रकरणात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.या प्रकरणावरून दादा भूसे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. संजय राऊत यांचा महागद्दार असा उल्लेख करत येत्या २६ तारखेपर्यंत माफी मागितली नाही तर शिवसैनिक त्यांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,असा प्रहार दादा भूसेनी केला. (sanjay raut mahagaddar, don’t apologize by March 26 if…”, dada bhuse’s speech in the legislative assembly)

ADVERTISEMENT

संजय राऊतांचे ट्वीटमध्ये काय?

हे आहेत मंत्री दादा भूसे, शेतकरी त्यांच्यामुळे रस्त्यावर आले आहेत गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स ४७ सभासदांच्या नावावर दाखवलेय, ही लुट आहे लवकरच स्फोट होईल,असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी करत दादा भूसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपावर भूसे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे वाचलं का?

खासदारकीचा राजीनामा द्यावा

संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटचा समाचार घेत दादा भूसे यांनी विधानसभेत आक्रमक पावित्रा घेतला.आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार संजय राऊत असा उल्लेख करत भूसेंनी (Dada Bhuse) संपुर्ण ट्विट विधानसभेत वाचत राऊतांचा आरोप खोडून काढला.

चुंबन प्रकरणावरून एसआयटी,अन् फोटोमुळे माझ्यावर गुन्हा: संजय राऊत

ADVERTISEMENT

कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करा.त्या चौकशीत मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचा नव्हे तर राजकारणातून मी निवृत्त होईन, असे थेट आव्हानचं सभागृहात देऊन टाकलं.मात्र जर या प्रकरणात काहीही खोटं आढळून आलं तर या महागद्दाराने सुद्धा खासदारकीचा राजीनामा द्यावा,दैनिक सामनाचा राजीनामा द्यावा,असे खुलं चॅलेज राऊतांना दिले आहे.

ADVERTISEMENT

ठाकरे-दरेकरांमध्ये विधानसभेबाहेर सहानुभूतीची युती! नेमकं काय घडलं?

हे (संजय राऊत) भाकरी मातोश्रीची खातात,पण चाकरी राष्ट्रवादीची करतात, असा हल्लाबोलल देखील भूसे (Dada Bhuse) राऊतांवर केला.तसेच या महागद्दाराने मालेगावच्या नागरीकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. जर येणाऱ्या २६ तारखेपर्यंत माफी मागितली नाही तर बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक त्यांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,अशी टीका देखील त्यांनी केली.

Sanjay Gaikwad Audio Clip :आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) आता दादा भुसेंचे हे आव्हान स्विकारतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तसेय संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य हे येणाऱ्या काळात कळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT