sanjay Raut PC : राऊतांनी पत्रकार परिषदेत घेतलं ईडी अधिकाऱ्याचं नाव; सोमय्यांना केला सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं होतं. ईडीचा तो अधिकारी कोण अशी चर्चाही त्यांच्या फेब्रुवारीमधील पत्रकार परिषदेपासून सुरू होती. अखेर आज संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर आरोप केले. खंडणी वसुली करुन परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे. ईडीच्या खंडणी रॅकेटच्या एजंटमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही असल्याचा दावा राऊत यांनी केला.

ADVERTISEMENT

ईडीचा अधिकारी कोण? काय म्हणाले राऊत?

शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी काही धक्कादायक आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांवर केले. यात काही व्यवहारांचा उल्लेख करत राऊतांनी भाजपच्या नेत्यांचाही भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

sanjay Raut PC : ईडीचे अधिकारी भाजपचे एटीएम मशीन झालेत; राऊतांच्या निशाण्यावर भाजपचे नेते

“ईडी काय करतेय. मी जे पत्र दिलं आहे तो फक्त एक भाग आहे. असे मी दहा पत्र देणार आहे. मागील काही वर्षांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट यांचं एक नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स, कॉर्पोरेट्स कंपन्यांना घाबरवण्याचं काम करत आहे.”

ADVERTISEMENT

“ईडीचं एजंटचं नेटवर्क खंडणी वसुली काम करत आहे. त्याची सविस्तर माहिती मी पंतप्रधानांना दिली आहे. मी कागदपत्रांच्या आधारे बोलत आहे. ईडी अधिकाऱ्याचं जे खंडणी वसुली रॅकेट आहे. त्यातील महत्त्वाचा घटक आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र चंद्रलाल नवलानी.”

ADVERTISEMENT

“मी त्याचा पॅन नंबर आणि त्याच्या सात कंपन्यांची माहिती दिली आहे. या सात कंपन्यांमध्ये जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त बिल्डर्स आणि डेव्हलपर्सकडून वसुली करण्यात आली आहे. खंडणी घेतली आहे. ज्यात रोख रक्कम आहे. त्याचबरोबर चेक द्वारेही पैसे घेतलेले आहेत.”

“ज्या ज्या कंपन्यांची ईडीचे चौकशी केली. त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये पैसे जमा केले आहेत. नवलानी हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मी काही उदाहरण देणार आहे. २०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची चौकशी सुरू केली. अचानक जितेंद्र नवलानींच्या सात खात्यांमध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्स आणि त्यांच्या संबंधित कंपन्यांकडून २५ कोटी रुपये जमा केले गेले.”

‘भाजपची लोकं रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?’, संजय राऊतांचा बोचरा सवाल

“त्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत एस. आर. वाधवान आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जितेंद्र नवलानीच्या कंपनीच्या खात्यांमध्ये आणखी १५ कोटी रुपये जमा केले गेले. याचप्रमाणे अविनाश भोसले आणि त्यांच्या कंपन्यांची ईडीने चौकशी सुरू केली. त्यानंतर लगेच अविनाश भोसले आणि त्यांच्या कंपन्यांकडून १० कोटी रुपये जितेंद्र नवलानी आणि त्याच्या सात कंपन्यांच्या नावे जमा केले गेले.”

“युनायटेडच्या प्रकरणातही हेच झालं. जशी ईडीची चौकशी सुरू झाली. तसं जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये जमा केले गेले. गेलॉर्ड कंपनी लिमिटेड या कंपनीविरुद्ध ईडीची चौकशी सुरू होताच १० कोटी नवलानीच्या कंपनीमध्ये अनसिक्योयर्ड लोन म्हणून जमा झाले. मॉन्शर फायर विरुद्ध ईडीची चौकशी सुरू झाली, लगेच १० कोटी जमा झाले.”

“मी पंतप्रधानांना सांगितलं आहे की ही यादी न संपणारी आहे आणि हे पैसे फक्त नवलानीच्या कंपनीतच जमा झालेले नाहीत, तर आणखी काही लोक आहेत. ईडीच्या एजंटच्या खात्यात जमा झाले आहेत. रोख रक्कम सुद्धा दिली गेली आहे. ती आकडेवारी माझ्याकडे आहे.”

“ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याने कुठून पैसा घेतला. कुठे घेतला. कुठे दिला गेला. सगळी माहिती माझ्याकडे आहे. हळूहळू मी हे सांगणार आहे. कोण आहे, जितेंद्र नवलानी. कुणाचा माणूस आहे. किरीट सोमय्यांचा आणि त्याचा काय संबंध आहे.”

“ईडीचे सर्वात मोठे अधिकारी जे मुंबई दिल्लीचं काम पाहत आहेत, त्यांचा काय संबंध आहे? पैसे का जमा केले जात आहेत? ज्या कंपन्या सार्वजनिक बँकांच्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीये, ते जितेंद्र नवलानी आणि त्यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये का देत आहेत? कन्सलटन्सी शुल्क आहे आहे? कोणती कन्सलटन्सी सुरू आहे?”

“कार्यालय नाही, कर्मचारी नाही. कोणती कन्सलटन्सी सुरू आहे? हा सगळा पैसा मुंबई आणि दिल्लीत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी जमा होत आहे. त्यातून बाहेरच्या देशांमध्ये बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे आणि हे लोक आमच एक-दोन लाखांचे व्यवहार बघत आहेत. तुमचा व्यवहार कोण बघणार?”

“या रॅकेटमध्ये महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेतेही सहभागी आहेत. मी हे असंच बोलत नाही, माझ्याकडे कागदपत्रं आहेत. हे गंभीर प्रकरण आहे. भ्रष्टाचार रॅकेट सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही त्रास देण्याचं काम या रॅकेटकडून केलं जात आहे. आज मी जे सांगितलं आहे, हे १० टक्के आहे.”

“मी ज्या जितेंद्र नवलानी आणि रॅकेटचा उल्लेख केला आहे. त्यासंदर्भात मुंबई पोलीस गुन्हा दाखल करत आहे. जितेंद्र नवलानीसह ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. मुंबई पोलीस या रॅकेटचा तपास आजपासून सुरू करत आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे, या खंडणी वसुली रॅकेटचा तपास करण्यास.”

“माझे शब्द लिहून ठेवा ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील. चोरी, खंडणी वसुली… हे कोट्यवधी रुपये कुठे जात आहेत? हे पैसे पीएम केअर फंडात जात नाहीत, तुमच्या घरात चाललाय. विदेशात चाललाय. हे रॅकेटही उघडं पाडेल. त्यात कोणते भाजपचे नेते आहेत, हेही सांगेन. वसुली एजंटामध्ये भाजपचेही नेते सहभागी आहेत.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT