Satara: पाटणमध्ये गोळीबार, दोन ठार; ठाण्यातील मदन कदम पोलिसांच्या ताब्यात
Satara News: राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची घटना घडली आहे. पाटण तालुक्यात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत दोन जण ठार झाले असून, एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्याती माजी नगरसेवक मदन कदम यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मोरणा विभागातील शीद्रुकवाडी येथे गोळीबाराची […]
ADVERTISEMENT

Satara News: राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची घटना घडली आहे. पाटण तालुक्यात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत दोन जण ठार झाले असून, एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्याती माजी नगरसेवक मदन कदम यांना ताब्यात घेतलं आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मोरणा विभागातील शीद्रुकवाडी येथे गोळीबाराची घटना घडली. गुरेघर धरण परिसरात गोळीबार झाल्याच्या प्रकरणाने परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (19 मार्च) रात्री ही घटना घडली. पवनचक्कीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. जुना वाद मिटवण्यासाठी बोलणी सुरू असताना पुन्हा वादाचा भडका उडाला आणि रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
Shiv Sena UBT: “अमित शाहांची विधाने म्हणजे सरकारचा केमिकल लोचा झाल्याचा पुरावा”









