Savarkar row : सावरकर वादावर सत्यजीत तांबेंचं मोठं विधान, राहुल गांधींबाबत म्हणाले…
Santyajeet Tambe reaction on Savarkar Row : सावरकरांवर बोलणं ही अनावश्यक गोष्ट होती. त्याचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. प्रत्येकवेळी त्यांना माफीवीर म्हणणं किंवा माफी मागण्याच कनेक्शन जोडणं हे अनावश्यक होतं,अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
Santyajeet Tambe reaction on Savarkar Row : कॉग्रेस नेते राहूल गांधी (rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर देशासह राज्यातलं वातावरण चांगलेच तापलंय. राज्यात तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनी राहुल गांधींच्या भूमिकेचा विरोध केला होता. या सावरकर वादावर (Savarkar Row) आता कॉग्रेसमधून निलंबित झालेले आमदार डॉ.सत्यजीत तांबे (Santyajeet Tambe) यांनी मुंबई तकवर मोठे विधान केले आहे. सावरकरांवर बोलणं ही अनावश्यक गोष्ट होती. त्याचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. प्रत्येकवेळी त्यांना माफीवीर म्हणणं किंवा माफी मागण्याच कनेक्शन जोडणं हे अनावश्यक होतं,अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. (Satyajit Tambe big statement on Savarkar row rahul gandhi unnecessary to talk about Savarkar)
ADVERTISEMENT
सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते, त्याचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. हे योगदान नाकारता येणार नाही. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना माफीवीर म्हणणं किवा माफी मागण्याच कनेक्शन जोडणं हे अनावश्यक होते, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली. तसेच 21 व्या शतकातल्या पिढीला हे नको आहे. त्यांना रोजगार हवंय, स्टार्टअप हवंय असे सत्यजीत तांबे (Santyajeet Tambe) म्हणाले आहेत.
कॉग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची वेगळी विचारधारा आहे, प्रत्येक पक्षाची असते. कॉग्रेसची जी विचारधारा आहे तीच राष्ट्रवादीची अथवा शिवसेनेची असू शकते असे काही नाही आहे. प्रत्येकाची भूमिका वेगळीय, पण ज्यावेळेस तुम्ही एकत्र राजकारण करता, अशावेळी दोन पाऊले मागे जाण्याची तयारी प्रत्येक पक्षाने ठेवली पाहिजे असे सत्यजीत तांबे (Santyajeet Tambe) म्हणाले आहे.
हे वाचलं का?
तसेच राज्यात जेव्हा महाविकास आघाडी आकार घेत होती. तेव्हा कॉग्रेस भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत सामील झाली होती. त्यामुळे अशा प्रकरणात भूमिका मांडताना दोन पाऊले मागे जाण्याची तयारी प्रत्येक पक्षाला ठेवावी लागेल, असे सत्यजीत तांबे (Santyajeet Tambe) म्हणाले आहेत.
राहुल गांधींसोबत जे काही चाललंय ते राजकिय द्वेषापोटी चालंलय. देशाच्या राजकारणासाठी आणि लोहशाही साठी चांगल नाही. राहुल गांधींवर क्षुल्लक गुन्हा होता, त्यांच्याकडे अपीलची वेळ असताना थेट कारवाई करण्यात आली. त्यामुळे एवढी काय घाई होती, असा सवाल तांबे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सत्तेत येण्याची जी भाजपमध्ये धडपड दिसते ती विरोधकांमध्ये दिसत नाही,असेही मत त्यांनी मांडले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT