वाढत्या कोरोना संकटामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ‘या’ राज्यांमध्येही शाळा बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होताना दिसतं आहे. तो संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह बहुतांश ठिकाणच्या शाळा बंद आहेत. मात्र एकटं महाराष्ट्रच नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणू नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या सात दिवसांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून दिल्ली, आसाम, गुजरात ओदिशा, गोवा या राज्यांनीही पहिली ते आठवी किंवा पहिली ते नववीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले…

आपण जाणून घेऊ कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झाला आहे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय?

हे वाचलं का?

दिल्ली- दिल्लीमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ दिसू लागल्यानंतर 3 जानेवारी 2022 पासून शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील असं सांगण्यात आलं आहे. या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात यावं ही मुभा देण्यात आली आहे.

आसाम-आसाम सरकारनेही ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि वाढते कोरोना रूग्ण या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद असणार आहेत. आजच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. गुवाहाटीमध्येही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 9 वी ते 11 वीचे वर्ग रोटेशन पद्धतीने सुरू राहणार आहेत. 12 वीचे वर्ग, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आहे तसे सुरू राहणार आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र-महाराष्ट्रात 5 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रातल्या शाळा बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र पहिली नववीच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

गोवा-गोव्यातही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीपर्यंत गोव्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी लसीकरण पूर्ण करून शाळा सुरू ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

झारखंड-झारखंडमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. 15 जानेवारी 2022 पर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

हरयाणा-हरयाणामध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्याने 12 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जाहीर केलं.

बिहार-बिहारमध्ये शाळा, महाविद्यालयं, कोचिंग करणाऱ्या संस्था आणि हॉस्टेल्स 21 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर 9 वी ते 12 वीचे वर्ग 50 टक्के उपस्थितीसह सुरू आहेत.

पंजाब-पंजाबमध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्याने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 7 जानेवारीला यासंदर्भातला निर्णय़ जाहीर केला.

उत्तर प्रदेश- उत्तरप्रदेशात 5 जानेवारीला शाळा, महाविद्यालयं बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जानेवारीपर्यंत 10 वीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू आहेत. तर दहावीपर्यंतचे वर्ग हे ऑनलाईन सुरू आहेत.

तेलंगण- 3 जानेवारीला तेलंगणमधल्या शाळा बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. रूग्ण कमी झाले तर पुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही जाहीर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT