नागपूर : देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर पोलिसांचे ४ सशस्त्र जवान तैनात करण्यात आले असून नागपूर पोलिसांनी QRT टीमही फडणवीस यांच्या घराबाहेरील सुरक्षाव्यवस्थेत सहभागी होणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी राहत असून नागपूर येथील घरात फडणवीस यांचं कार्यालय आणि वर राहण्याची जागा आहे.

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या सभेत कोरोनाचे नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनिल देशमुखांविरोधात रविवारी नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजपविरोधात संविधान चौकात निदर्शन केली. यानंतर फडणवीस यांच्या घराबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान अनिल देशमुखांना परमबीर सिंग प्रकरणात पाठींबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वारंटाईन होते तर मग १५ फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांच्या लवाजम्यात त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. त्यासाठी त्यांनी अनिल देशमुख यांचं १५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचं ट्विटही पोस्ट केलं आहे.

पाहा काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT