शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सवाल
भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलं. न्यायालयाच्या निर्णयाने भाजपने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची चंद्रकांत पाटील यांनी आज […]
ADVERTISEMENT
भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केलं. न्यायालयाच्या निर्णयाने भाजपने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना सरकारवर टीकास्त्र डागलं.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. एन.डी. पाटील यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की, न्यायालयालाही धुडकावून हम करे सो कायदा या पद्धतीने ते वागत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे’, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय मांडलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांविषयी दिलेला निर्णय देशातील कोणत्याही सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. अशा प्रकारे एखाद्या सरकारने मनमानी केली, तर लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचं मत न्यायालयानं सुनावणीत व्यक्त केलं होतं. आघाडी सरकारनं बहुमताच्या जोरावर भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करून अन्याय केला असला; तरी न्यायालय आम्हाला न्याय देईल याचा विश्वास होता’, असं पाटील म्हणाले.
‘आघाडी सरकारनं घेतलेला १२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे. कृत्रिम बहुमताच्या जोरावर देशाच्या संविधानाचं उल्लंघन करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सरकारला या निकालामुळे धक्का बसला आहे’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘आघाडी सरकारनं गारपिटीनंतर, अतिवृष्टीनंतर, पूरानंतर शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई दिलेली नाही. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण केली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, तर फळांना योग्य भाव द्यावा. दारुचा सुळसुळाट करून शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का?’, असा सवाल पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT