Pritam Munde यांना डावललं, बीडमध्ये राजीनामा सत्र; फडणवीसांविरोधात पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी
बीड: बीडच्या (Beed) भाजप (BJP) खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने बीड आणि परळीमधील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे. फक्त नाराजीच नव्हे तर आता जिल्हा पातळीवर त्याचे पडसाद देखील उमटू लागले आहेत. कारण आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या तब्बल 25 पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा (Resignation) दिला असल्याचं समजतं […]
ADVERTISEMENT
बीड: बीडच्या (Beed) भाजप (BJP) खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने बीड आणि परळीमधील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे. फक्त नाराजीच नव्हे तर आता जिल्हा पातळीवर त्याचे पडसाद देखील उमटू लागले आहेत.
कारण आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या तब्बल 25 पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा (Resignation) दिला असल्याचं समजतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 11 तालुकाध्यक्षांनी देखील राजीनामे दिले आहेत.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने त्यांच्या अनेक समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे या राज्यात आपल्याला वरचढ होतील अशी भीती असल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाने त्यांना डावललं असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पाहा मुंडे समर्थकांनी नेमकं काय म्हटलं आहे:
‘आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री होती की, प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल. आम्हाला असं 101 टक्के वाटत होतं की, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलंच जाईल. आम्हाला यासाठी असं वाटत होतं की, महाराष्ट्रात जेव्हा भारतीय जनता पार्टी हा पक्षच जेव्हा कोणाला माहिती नव्हता तेव्हा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली.’
ADVERTISEMENT
‘या पक्षासाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे. इतकं मोठं योगदान असताना या मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम ताईंना घेतील असं वाटणं हे साहजिक होतं. परंतु मंत्रिमंत्रळात त्यांना जे डावललं गेलं आहे त्याबद्दल केवळ नाराजी नाही तर आमच्या सर्वांच्या मनात अशी खात्री आहे किंवा संशय असा झाला आहे की, जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व हे ताईसाहेबांच्या नेतृत्वाशी तुलना करत आहे आणि ताईसाहेब त्यांना वरचढ होईल अशी भीती त्यांना आहे.’
ADVERTISEMENT
‘यामुळेच ते ताईसाहेबांना बाजूला सारत आहेत. इथून पुढे ते असेच त्यांना बाजूला सारत राहतील असा आमच्या मनात संशय आहे.’ अशी प्रतिक्रिया अंबाजोगाईचे भाजपचे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे यांनी दिली आहे.
गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी
‘पक्ष सोडणार पण ताईंच्या पाठिशी ठाम राहणार’
‘आम्ही सर्व नगरपरिषदेचे, पंचायत समिती सदस्य आमचे सर्वांचे राजीनामे हे जमा करुन जिल्हाध्यक्षांकडे देणार आहोत आणि नंतर ते पंकजाताईंकडे सुपूर्द करणार आहोत. आम्ही भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा देणार आहोत. पण आम्ही ताईंच्या सोबत कायम ठामपणे उभे राहणार आहोत.’ अशी प्रतिक्रिया एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.
ADVERTISEMENT