तुमच्या पार्टनरचं होत नाही समाधान? मग 9 गोष्टी करा अन् वाढवा सेक्स स्टॅमिना
tips for increase sex stamina : अनेक पुरुष त्यांच्या पार्टनरला शारीरिक सुख देऊ शकत नाही. कारण सेक्स स्टॅमिना. पुरुषांनी सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. याचा चांगला फायदा लैंगिक आयुष्य सुधारण्यास होतो.
ADVERTISEMENT

रिलेशनशिपमध्ये सेक्स लाईफ म्हणजे शारीरिक संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे सेक्स लाईफ चांगली ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. सेक्स स्टॅमिना वाढवणारे पदार्थही खातात. पण, काही पुरुषांना याचा काहीच फायदा होत नाही. तुमच्या आयुष्यातही असंच घडत असेल, तुम्ही तुमच्या पार्टनरला समाधानी करू शकत नसाल, तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी करायला हव्यात. या गोष्टीमुळे तुमचं सेक्स लाईफ चांगलं होऊ शकतं.
सेक्स स्टॅमिना कसा वाढवायचा? (How to improve sex power)
काही पुरुष सेक्स करण्यासाठी खूप उतावीळ असतात, पण प्रत्यक्षात ते पार्टनरला समाधानी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्य तणावग्रस्त होऊन जातं. ही समस्या सोडवण्यासाठी काही लोक डॉक्टरकडेही जातात. पण, डॉक्टरकडे जाऊनच या समस्येतून सुटका होते असं नाही, काही छोट्या छोट्या गोष्टी करूनही तुम्ही सेक्स स्टॅमिना वाढवू शकता.
हे ही वाचा >> Sex Health: रोज सेक्स करणे चांगले आहे का?, तज्ज्ञ म्हणतात…
आहारात करा बदल
food for increasing sex stamina : असंख्य लोकांना मासांहार करायला (non veg) आवडत नाही. पण, तुम्हाला हे माहिती आहे का की नॉन व्हेजचा आहारात समावेश केल्यामुळे सेक्स स्टॅमिना सुधारण्यास मदत होते. यातही तुम्ही रेट मीट (लाल मांस) किंवा वरहाचं मांस खायला हवं. एका संशोधनानुसार एक व्यक्ती एका आठवड्यात अर्धा किलो रेट मीट खात असेल, तर त्यांचा सेक्स स्टॅमिना दुप्पट होतो.
जोडीदाराला प्रेमाने घ्या मिठीत
तुमच्या जोडीदाराला मिठी मारणे मोठी गोष्ट नाही, पण प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्टी करायला हव्यात. एका संशोधनानुसार मूड बनवण्यासाठी पार्टनरला 20 सेंकद घट्ट मिठी मारायला हवी. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये वेगळी बॉण्डिंग तयार होते. यामुळे लैंगिक संवेदनाही वाढतात.









