Shahrukh Khan : शाहरुख खानला झटका; होऊ शकतो पठाणच्या कमाईवर परिणाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bollywood Super star Shahrukh Khan : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie Break Records) सातत्याने अनेक विक्रम मोडत आहे. या चित्रपटाबद्दल बोलले जात आहे की, हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनू शकतो. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. मात्र, शाहरुख खानसाठी एक वाईट बातमी आली आहे. Bad News For Shahrukh Khan

ADVERTISEMENT

Telegram वर चित्रपट लीक

पठाण चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. याचा परिणाम त्याच्या कमाईवर होऊ शकतो. ही फिल्म अनेक पायरेटेड ऑनलाइन साइट्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पठाण इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर लीक झाला आहे. हा चित्रपट अनेक चॅनेल्स आणि ग्रुप्समध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये 480p, 720p आणि 1080p रिझोल्यूशन गुणवत्ता समाविष्ट आहे.

Pathaan Movie : ‘पठाण’ चित्रपटाने बॉलिवूडसाठी बदलल्या या ५ गोष्टी

हे वाचलं का?

बर्‍याच चॅनेलवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम दर्जाच्या व्हिडिओचा साईज 2.4GB आहे तर इतर रिझोल्यूशनचा साईज कमी आहे. अनेक चॅनेल्स टेलिग्रामवर उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पठाण चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ही बातमी लिहेपर्यंत अनेक वाहिन्यांनी हा चित्रपटही काढून टाकला आहे.

शाहरुख खानने पठाणसोबत तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यावर बहिष्कारही टाकण्यात आला आहे. पण, वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमा लीक झाल्यानंतरही लोक सिनेमा हॉलमध्ये तो पाहण्यासाठी जात आहेत. चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काश्मीर फाइल्स, पंचायत-2 आणि इतर चित्रपट ऑनलाइन लीक झाले आहेत. चित्रपट ऑनलाइन लीकर्स पकडणे अजूनही एक मोठे आव्हान आहे.

ADVERTISEMENT

Pathaan : पठाणचं वादळ कायम; ठरला बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट

ADVERTISEMENT

400 कोटींच्या पार पठाण

दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही चित्रपटासाठी एवढा पैसा गोळा करणे खरोखरच इम्प्रेसिव्ह आहे. पठाणचे कलेक्शन रोज चकित करणारे आहे. यासह पठाणने 11 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार करून पुन्हा इतिहास रचला आहे. शनिवारच्या उत्तम कमाईनंतर, रविवारी (5 फेब्रुवारी) चित्रपटाचे कलेक्शन गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

आमिर खानचा ‘दंगल’ हा भारतीय बॉक्स ऑफिसवर 387 कोटींच्या कलेक्शनसह आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट होता. पण पठाणच्या शनिवारच्या कलेक्शनच्या अंदाजावरून शाहरुखचा पठाण हा आमिर खानच्या दंगलला मागे टाकत भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. पठाणचा डंका जगभरातील बॉक्स ऑफिसवरही वाजत आहे. शाहरुखचा चित्रपट परदेशातही यशाची पताका फडकवत आहे. आता यापुढे पठाण किती कमावतो ते पाहू.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT