Sharad Pawar गुगली टाकण्यात एक्स्पर्ट, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार अशा प्रकारे गुगली टाकण्यात पटाईत आहेत. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही असं वक्तव्य माजी केंद्रीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार अशा प्रकारे गुगली टाकण्यात पटाईत आहेत. शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात केलं आहे. आजपर्यंत त्यांनी अनेकदा अशा गुगली टाकल्या आहेत असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार टिकणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे त्या सरकारला काहीही धक्का लागणार नाही. नाना पटोले हे सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. त्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे की आमचा पक्ष खंबीर करण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आम्ही तिघे एकत्र असलो तरीही आमचा पक्ष काही तोडमोडीला काढणार नाही. जोपर्यंत जवळ असणार आहोत तोपर्यंत असणार आहोत. मात्र पक्षाची उभारणी करणं यात काही गैर नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

सहकार खातं अमित शाह यांच्याकडे दिलं आहे त्याबाबतही सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यामुळे राज्यातील सहकारावर काही परिणाम होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली सहकारी चळवळ खंबीरपणे उभी आहे. कुणीही आलं तरीही काम चांगल्या पद्धतीने होतं पण कुणीही आलं तरीही काहीही डिस्टर्ब होणार नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. केंद्राकडून ईडी, सीबीआय सारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होतोय हे दुर्दैवं आहे, असंही शिंदे म्हणाले.

नवाब मलिक काय म्हणाले?

हे वाचलं का?