देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद पवार यांचा टोला

मुंबई तक

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आनंदी होते हे वाटलं नाही. हा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा टोला पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावलाय. एकनाथ शिंदे यांचं त्यांनी अभिनंदन केलंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हा टोला लगावला आहे. काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar) देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ऐनवेळी घेतली. त्याबाबत बोलत असताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आनंदी होते हे वाटलं नाही. हा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा टोला पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावलाय. एकनाथ शिंदे यांचं त्यांनी अभिनंदन केलंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हा टोला लगावला आहे.

काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar)

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ऐनवेळी घेतली. त्याबाबत बोलत असताना शरद पवार म्हणाले की फडणवीस यांनी क्रमांक दोनची जागा आनंदाने स्वीकारली असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत होता. मात्र ते नागपूरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो त्यामुळे त्यांना तो पाळावा लागला हेच दिसून आलं.

खरं तर शिवाजीराव निलंगेकर ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेते आधी मुख्यमंत्री होते त्यांनी नंतर बाकीची पदंही भुषवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडलं याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?