Sharad Pawar यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. नवाब मलिक यांनी सांगितलं कारण

मुंबई तक

शरद पवार हे कालपासून दिल्लीत आहेत. राज्यसभेचे नेते म्हणून पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होतं आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली. खूप दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी णि शरद पवार यांची भेट झाली नव्हती फोनवर बोलणं झालं होती. रेग्युलेटरी अॅक्टमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते बँकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे बॅकिंग […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शरद पवार हे कालपासून दिल्लीत आहेत. राज्यसभेचे नेते म्हणून पियुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होतं आहे. त्यापार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली. खूप दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी णि शरद पवार यांची भेट झाली नव्हती फोनवर बोलणं झालं होती. रेग्युलेटरी अॅक्टमध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते बँकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे बॅकिंग रेग्युलेटरी कायद्यात जे बदल करण्यात आले आहेत. ते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. त्याआधी त्यांनी राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

जे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे सहकारी बँक ही एखाद्या धनाढ्य माणसाच्या ताब्यातही जाऊ शकते. सहकार क्षेत्र सध्या वेगळं करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा जो निर्णय घेतला गेला आहे त्या निर्णयामुळे सहकारी संस्था, बँका यांना स्वायत्तता देण्यासाठी घटनादुरूस्ती करण्यात आली होती. मात्र बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टच्या अंतर्गत ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे मर्यादित अधिकार RBI कडे आहेत. मात्र बदलांमुळे काय काय घडू शकतं याचं एक लेखी पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी दिलं. जे मुद्दे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं त्याबद्दल ते सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

देशातली कोरोना परिस्थिती, महाराष्ट्रात कमी पडणारा लस पुरवठा, कोरोनावरच्या उपाय योजना याबाबतही शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांमध्ये तथ्य़ नाही. शरद पवार यांची आणि पियुष गोयल, राजनाथ सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांच्यावरच्या कारवाईचीही माहिती

शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीच्या नावे वरळीत असलेला फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. तसंच आठ एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांच्या वसुलीचे आरोप केले. काल जे घर जप्त करण्यात आले ते अनिल देशमुख यांनी 2005 घेतलं आहे. सचिन वाझेचं म्हणणं आहे की आम्ही पैसे आत्ता दिले मात्र वाझेच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. पैशांच्या गैरव्यवहारांचे आरोप कोणत्या निकषांवर अनिल देशमुख यांच्यावर केले जात आहेत ते आम्हाला कळत नाही. 4 कोटी 20 लाख रूपयांच्या बदल्यात या दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मात्र ही प्रॉपर्टी पूर्वीच खरेदी करण्यात आली आहे. पैसे दिल्लीला गेले, धुत्तुमची जागा काही शे कोटींची आहे अशाही बातम्या पेरल्या गेल्या. मात्र या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp