shirdi airport : साईभक्तांसाठी गुड न्यूज! विमानतळावर होणार नाईट लँडिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

shirdi airport latest News : शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. गुरुवारी सकाळी (16 फेब्रवारी) डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले.

ADVERTISEMENT

साईबाबाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांना शिर्डीत येणं अधिक सोयीचं झालं आहे. नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत.

Kalyan: काळा तलावात CM शिंदेंचा इतका जीव का? काय आहे ठाकरे कनेक्शन?

हे वाचलं का?

गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला होता. बुधवारी (16 फेब्रुवारी) डीजीसीएकडून हा परवाना देण्यात आला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणजे 2017 मध्ये शिर्डी विमानतळ सुरु झाले होते.

bhimashankar : देशात बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रात किती? जाणून घ्या

ADVERTISEMENT

नाईट लँडिंग परवानगी मिळाल्यानं भाविकांची शिर्डी यात्रा तर सुलभ होणार आहे. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT