मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली असेल, म्हणूनच…; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेनं फेर धरला असल्याचं दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणून नका असं विधान केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांचा भविष्यातील सहकारी असा उल्लेख केला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं असून, ‘मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली असेल’, इतकाच आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ असल्याचं त्यांनी म्हटलं.

ADVERTISEMENT

मुंबईतील चेंबूर येथे भाजप कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. यावेळी त्यांनी शिवसेनेसह सरकारवर टीका केली. ‘भाजप आपलं कार्यालय हफ्ता वसुली करून बांधत नाही. हितचिंतकांच्या मदतीने बांधते’, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.

‘…आणखी 48 तास बाकी आहेत’, चंद्रकांत पाटलांनी नेमके कसले संकेत दिले?

हे वाचलं का?

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीस काय म्हणाले?

‘त्यांच्या शुभेच्छा ठिक आहे. चांगली गोष्ट आहे… राजकारणात कधीही काही होऊ शकते. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. आणि हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचिक मुख्यमंत्र्यांनाही याची जाणीव झाली असेल; अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

‘माजी मंत्री म्हणू नका… दोन-तीन दिवसात कळेल’ चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

ADVERTISEMENT

‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे; मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. हे त्यांना रिअलाईज झालं’, असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी युतीबद्दलच्या चर्चेला उत्तर दिलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचा अनावर सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केली. ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’ असं मुख्यमंत्री म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT