Shiv Sena: शिवसेनेची उद्योगांवरुन शिंदेवर टीका, पण ‘सामना’तून कौतुकाची बातमी?
Saamana News: मुंबई: राज्यातील उद्योगधंदे (industries) बाहेर चालले आहेत, राज्यात जे उद्योग आहेत ते देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत किंवा बंद पडत आहेत. असे आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष (Shiv Sena) सातत्याने करत आहे. त्यातही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Govt) उद्योग धोरणांवर जोरदार प्रहार करत […]
ADVERTISEMENT

Saamana News: मुंबई: राज्यातील उद्योगधंदे (industries) बाहेर चालले आहेत, राज्यात जे उद्योग आहेत ते देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत किंवा बंद पडत आहेत. असे आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष (Shiv Sena) सातत्याने करत आहे. त्यातही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Govt) उद्योग धोरणांवर जोरदार प्रहार करत असल्याचं गेल्या काही महिन्यात पाहायला मिळत आहे. त्यावरुन ते वारंवार सरकारला धारेवर देखील धरतात. मात्र, असं असतानाचा आता त्यांच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये (Saamana) चक्क अगदी विरोधाभास वाटावा अशी बातमी छापून आली आहे. (shiv sena criticizes shinde from industries but news of praise from saamana newspaper)
‘राज्यातील उद्योगधंद्यांच्या चक्राला वेग’ अशा मथळ्याखाली छापून आलेल्या बातमीत राज्यातील उद्योगधंद्यांना लागणाऱ्या विजेची मागणी कशी वाढली आहे याबाबत अगदी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे शिवसेना सातत्याने उद्योगधंद्यांविषयी सरकारच्या धोरणांवर आरोप करत असताना दुसरीकडे त्यांच्याच वृत्तपत्रात उद्योगधंद्यांना पूरक अशी वीज ग्राहकांची मागणी कशी वाढली आहे याचे वृत्तांकन करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच या बातमीमुळे राजकीय वर्तुळात देखील उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
2019 पासून शिवसेना नेते भाजपवर तुफान टीका करत असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, असं असताना देखील सामनामध्ये अनेकदा पंतप्रधान मोदी किंवा भाजपच्या जाहिराती छापून आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे यावरुन शिवसेनेवर अनेकांनी टीकाही केली आहे. मात्र, तो व्यावसायिक भाग असल्याचं सामनाकडून सांगितलं जातं. मात्र, आता सरकारची काहीशी भलामण करणारी बातमीच सामनात छापून आल्याने याचा नेमका अर्थ काय काढायचा अशी विचारणा अनेकजण करत आहे.