Shiv Sena: ‘निवडणूक आयुक्तांनी शेणच खाल्लं…’, अखेर ठाकरेंचा संयम सुटला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Eknath shinde Faction: मुंबई: ‘निवडणूक आयुक्तांनी शेणच खाल्लं.. शेणच खायचं होतं तर आम्हाला हा खटाटोप करायला का लावला? कदाचित उद्या केंद्र सरकारचे (Central Government) गुलाम जे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील. त्याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे.’ असं म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मातोश्री’वरील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग (Election Commission) आणि आयुक्तांबाबत प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरेंचा संयम सुटल्याचंही पाहायला मिळालं. (uddhav thackeray press conference after ec give shiv sena name and party symbol bow and arrow to shinde group)

ADVERTISEMENT

‘निवडणूक आयुक्तांनी शेणच खाल्लं…’

‘गेले काही दिवस निवडणूक आयुक्तांनी हे जे काही थोतांड केलं. ते थोतांड एवढं भयानक आहे की, आमच्याकडे लेखी मागणी काय आहे?, तुम्ही आम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांचे अर्ज द्या. ते आम्ही लाखांमध्ये दिली आहेत. मग हा खटाटोप कशाला सांगितला तुम्ही आम्हाला. तुम्ही जे-जे मागितलं होतं ते-ते आम्ही दिलं.’

‘पण हेच जर शेण खायचं होतं तर आधीच खायचं होतं ना शेण.. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खालेल्लं आहे ते शेणच खायचं होतं तर आम्हाला हा खटाटोप करायला का लावला? कदाचित उद्या केंद्र सरकारचे गुलाम जे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील. त्याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे. मशालीची धग काय असते ही यांना दाखवावी लागेल.’ अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केलं.

हे वाचलं का?

shiv sena symbol: पक्ष, चिन्ह गेलं! ठाकरेंचा पुढच्या लढाई निर्णय ठरला!

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकं काय-काय म्हणाले?

‘उद्धव ठाकरे म्हणाले, काय बोलायचं हा मोठा प्रश्न सध्या देशात निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक. मी तर अस म्हणेन की, देशाच्या स्वातंत्र्योत्सव सुरू असून, पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की, 75 वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे आणि आता देशातील लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरूवात केलेली आहे.’

ADVERTISEMENT

‘आजपर्यंत आपण अनेक उदाहरण पाहिली आहेत, जिथे सरकारची दादागिरी सुरू आहे. न्याय यंत्रणा सुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल, याच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कायदा मंत्री बोलत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलत आहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा अधिकार पाहिजेत. असंच जर हे सुरू राहिले तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत हे बोलण्याचं धाडस सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवलं पाहिजे.’

‘आजचा हा निर्णय आहे, तो अत्यंत अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मध्ये मी म्हणालो होतो की, तो निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय देऊ नये. पक्ष कुणाचा बरोबर आहे. कुणाबरोबर आहे. हे जर केवळ आणि केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवायला लागलो, तर कुणीही धनाढ्य माणुस आमदार, खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो.’

ADVERTISEMENT

‘गेले काही दिवस निवडणूक आयुक्तांनी हे जे काही थोतांड केलं. ते थोतांड एवढं भयानक आहे की, आमच्याकडे लेखी मागणी काय आहे?, तुम्ही आम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या. ती शपथपत्र आम्ही दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या सदस्यांचे अर्ज द्या. ते आम्ही लाखांमध्ये दिली आहेत. मग हा खटाटोप कशाला सांगितला तुम्ही आम्हाला. तुम्ही जे-जे मागितलं होतं ते-ते आम्ही दिलं.’

Shiv Sena: उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाच!

‘पण हेच जर शेण खायचं होतं तर आधीच खायचं होतं ना शेण.. आज निवडणूक आयुक्तांनी जे काही शेण खालेल्लं आहे ते शेणच खायचं होतं तर आम्हाला हा खटाटोप करायला का लावला? कदाचित उद्या केंद्र सरकारचे गुलाम जे आयुक्त बसलेले आहेत हे उद्या आमची मशाल पण काढून घेतील. त्याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे. मशालीची धग काय असते ही यांना दाखवावी लागेल.’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT