Aditya Thackeray यांच्या सभेत जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv sena leader Aditya Thackeray Aurangabad rally :

औरंगाबाद : शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या महालगाव येथील सभेदरम्यान जोरदार राडा झाला. यानंतर ठाकरेंना सुरक्षारक्षकांच्या मदतीने सभास्थळ सोडावं लागलं. सभास्थळी बाजूलाच रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणूक सुरु होती. यावेळी सभेत व्यक्तय होतं असल्यानं पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने आणि आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. (shiv sena leader Aditya Thackeray Aurangabad rally crises what happen)

नेमकं काय घडलं?

नाशिक, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारपासून सुरु झाला आहे. यात ते काल नाशिक जिल्ह्याचा दौरा संपवून औरंगाबादमध्ये गेले. यावेळी महालगावमध्ये पोहचले. यावेळी सभास्थळी बाजूलाच रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात होती. सभेमध्ये व्यक्तय येत असल्यानं पोलिसांनी भीमसैनिकांना मिरवणूक आणि डीजे थांबविण्याची विनंती केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यामुळे चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने स्टेजवर किरकोळ दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरात तणाव झाल्याचं बघता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. खबरदारीचा उपाय म्हणून आदित्य ठाकरेंनीही स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. यावेळी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Congress वाढवण्यासाठी पाठवलं, तोडण्यासाठी नाही! बड्या नेत्यानं पटोलेंना सुनावलं

ADVERTISEMENT

“तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मात्र मेळावा संपल्यानंतरही जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळीही दगडफेक करण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली. मात्र आदित्य ठाकरे गेल्यानंतरही गावात बराच काळ गोंधळाचं वातावरण होते.

Aditya Thackeray नाशिकमध्ये अन् कार्यकर्ते शिंदे गटात; CM शिंदेंचा दणका

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत आहे. त्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केलं. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप करत सरकारने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT