शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त अजून ‘काहीतरी’ दिले- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी शिंदे सरकारला अवैध ठरवत गंभीर आरोप केले आहेत. ममता म्हणाल्या उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी पैसाच्या व्यक्तीरिक्त आणखी काहीतरी दिलेले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये (India Today Conclave East) ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) […]
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी शिंदे सरकारला अवैध ठरवत गंभीर आरोप केले आहेत. ममता म्हणाल्या उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी पैसाच्या व्यक्तीरिक्त आणखी काहीतरी दिलेले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये (India Today Conclave East) ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या म्हणाल्या की, शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. बंडखोर आमदारांचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी (Shivsena Rebel MLA) आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्याचा पैसा आला कुठून? बंडखोर आमदारांना फक्त पैसेच पुरवले जात नव्हते आणि इतर अनेक गोष्टी तिथे पुरवल्या जात होत्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या?
यावर इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी तुम्हाला ‘अन्य काही’ म्हणजे काय, असा प्रश्न केला. यावर ममता म्हणाल्या की, कधी कधी गप्प राहणे चांगले असते म्हणूनच मी गप्प बसणे उचित आहे. भाजप काय करू शकतो, काय करू शकत नाही हे मला माहीत आहे. मला काय म्हणायचे आहे ते सर्वांना समजले आहे.
हे वाचलं का?
West Bengal CM @MamataOfficial attacks BJP govt at Centre, says “I have seen many governments but I haven't seen this type of vindictive govt. “इन्होने govt जीता है, महाराष्ट्र का दिल नही जीता”#ConclaveEast22 | Watch LIVE: https://t.co/BAmpJ8Jjb4 | @Sardesairajdeep pic.twitter.com/uGSpKP1JVK
— IndiaToday (@IndiaToday) July 4, 2022
ममता बॅनर्जींचा बुलडोझर धोरणावरून इशारा
मी म्हणते m, m, m, m, m, n, n, n….w, w, w, w, w आता यावरुन लोकांनी स्वतःच अंदाज बांधयचा आहे मला काय म्हणायचे आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर देखील निशाणा साधला. भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेत ममता बॅनर्जी यांनी पुढच्या निवडणुकीत देशातील जनता भाजपसाठी बुलडोझर ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पुढची निवडणूक भाजप विरुद्ध भारताची जनता अशी असेल. पुढे, राजदीप सरदेसाई यांनी विचारले की, विरोधमुक्त भारताची चर्चा सध्या सुरु आहे यावर ममता म्हणाल्या की, असे सूडबुद्धीचे सरकार मी पाहिलेले नाही. केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जनता तुम्हाला बुडवेल लोक लोकशाही मार्गाने भाजपवरती बुलडोझर चालवतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT