बदलापुरात शिवसेनेला झटका, तर कल्याणमध्ये शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची हकालपट्टी
–मिथिलेश गुप्ता, कल्याण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेतील फाटाफुटीचं सत्र सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहे. त्यात आता आणखी भर पडली असून, बदलापूर महापालिकेतील २५ माजी नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दुसरीकडे शिवसेनेनंही कारवाई करत शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची पदावरून हकालपट्टी केली […]
ADVERTISEMENT

–मिथिलेश गुप्ता, कल्याण
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेतील फाटाफुटीचं सत्र सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहे. त्यात आता आणखी भर पडली असून, बदलापूर महापालिकेतील २५ माजी नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दुसरीकडे शिवसेनेनंही कारवाई करत शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
बदलापूरमधील २५ माजी नगरसेवकांचं एकनाथ शिंदेंना समर्थन
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेचे शिवसेनेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याची चर्चा रंगली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे, पंचायत समितीचे बाळाराम कांबरी यांच्यासह इतर सदस्य आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सर्वच माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून दिवसेंदिवस पाठिंबा वाढताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या बहुतांश नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.