शिंदे विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयातील निकालाला 2 वर्षे लागणार?; शरद पवार काय बोलले?
शिंदे गट आणि शिवसेने वादासह राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. घटनापीठासमोरील सुनावणी प्रलंबित असून, हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्याचबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेऊन काही मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही. त्यावरही शरद पवारांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं. सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार […]
ADVERTISEMENT

शिंदे गट आणि शिवसेने वादासह राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. घटनापीठासमोरील सुनावणी प्रलंबित असून, हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्याचबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेऊन काही मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही. त्यावरही शरद पवारांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं.
सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला. मात्र, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या काही मंत्र्यांनी पदभारच घेतलेला नसल्याची माहिती समोर आलीये. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
मंत्रिपदाची शपथ पण खात्याचा पदभारच घेतला नाही, शरद पवार काय म्हणाले?
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही मंत्र्यांनी अद्याप खात्याची सुत्रं स्वीकारली नसल्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. शरद पवारांनी उलट प्रश्न केला की, ‘हे खरंय का? अमूक एका मंत्र्याने मंत्रीपदाची शपथ घेतलीये, पण खात्याचा पदभार घेतला नाही. असं एखाद दुसरा असेल, पण अधिक जण आहेत का? किती लोक आहेत अशी?’ असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.
फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू हे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं-शरद पवार