shiv sena symbol : ठाकरेंचा निवडणूक आयोगावर, तर शिंदेंचा राऊतांवर ठपका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

election commission hearing on shiv sena symbol case : शिवसेना (Shiv Sena) पक्ष कोणाचा? यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) 30 जानेवारीला लेखी परीक्षा दिली. म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (election commission of India) 30 जानेवारीला झालेल्या सुनावणीत शिंदे (Shinde Faction) आणि ठाकरे गटाने (Thackeray Faction) आयोगाच्या आदेशानुसार लेखी युक्तिवाद सादर केलाय. त्यातही एकमेकांवर आरोप केले आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या एका निर्णयावर आक्षेप घेतलाय, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकप्रतिनिधींना संजय राऊत यांनी धमकी दिल्याने महाराष्ट्र सोडावा लागल्याचा आरोप आपल्या लेखी युक्तिवादात केलाय. ठाकरे आणि शिंदे गटाने केलेल्या या लेखी आरोपात काय म्हटलंय ते आपण पाहूयात… (shiv sena symbol news)

ADVERTISEMENT

लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर शिंदे गटाकडून 124 पानांचा, तर ठाकरे गटाकडून 122 पानांचा लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आलाय. या युक्तीवादाबद्दल जाणून घेण्यासाठी याआधी काय झालं होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फुटीनंतर 19 जुलैला एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आणि थेट शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावर दावा केला होता. पण त्याआधीच ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून कुणी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला तर आपली बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी केली होती. दरम्यानच्या काळात शिंदे गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या कागदपत्र आपल्याला मिळावी म्हणून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे लेखी मागणी केली. होती. तसंच ठाकरे गटाच्या बाजूने कागदपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी मुदत वाढवून मागितली होती.

हे वाचलं का?

Exclusive : Election Commission समोर शिंदे-ठाकरे गटाचे फायनल दावे!

shiv sena symbol case : ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कोणत्या निर्णयावर काय घेतला आक्षेप?

दरम्यान, 3 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर केली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मूदत ही 14 ऑक्टोबर होती आणि निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार होती.

ADVERTISEMENT

8 ऑक्टोबरला आयोगाने अंधेरी पोटनिवडणूकी आधी धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. आयोगात आपलं म्हणणं मांडण्याआधीच हा निर्णय घेण्या आल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. हाच आक्षेप आपल्या लेखी युक्तिवादातही ठाकरे गटाने मांडलाय. आयोगात शिंदेंनी केलेल्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी आवश्यक कागदपत्र फाईल करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

ADVERTISEMENT

शिंदे गटाकडून आयोगात सादर करण्यात आलेली कागदपत्रं वेळेवर उपलब्ध करुन दिलं नाही आणि त्यावर उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ आयोगाने दिलेला नाही. जे नैसर्गिक न्यायाविरोधात आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या -ठाकरे गट

8 ऑक्टोबरला ठाकरे गटाला आपली कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. ठाकरे गटाने आपले पुरावे आणि कागदपत्र निवडणूक आयोगात सादर केली आणि अवघ्या तासाभरात आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना दोन्ही बाजूंचं म्हणणं आयोगाने ऐकलेलं नाही असंही ठाकरे गटाने आपल्या लेखी युक्तीवादात म्हटलं आहे.

आयोगाच्या पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर ठाकरे गटाने त्यावेळी आक्षेपही घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात धावही घेतली होती. “आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची आणि प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यास तातडीने स्थगिती द्यावी”, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे.

एकनाथ शिंदे NDA मध्ये आले, तरीही भाजपला महाराष्ट्रातील लढाई कठीण का?

Shiv Sena Symbol : शिंदे गटाने लेखी युक्तिवादात काय म्हटलंय?

आता शिंदे गटाने काय आरोप केलेत लेखी युक्तीवादात ते बघूयात. शिंदे गटाने पार्टीतल्या फुटीबद्दल सांगताना लेखी युक्तिवादात शिंदे गटातले आमदार आणि स्वतः एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या धमक्यांमुळे महाराष्ट्र सोडावा लागल्याचं म्हटलंय. ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस कडून या धमक्या आल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या धमक्या शिंदेंबरोबर गेलेल्या आमदार – खासदारांबरोबर त्यांच्या कुटुंबियांना येत होत्या आणि म्हणून शिंदे गटातल्या आमदार खासदारांना महाराष्ट्र सोडून जावं लागलं, असं शिंदे गटाने आपल्या लेखी युक्तिवादात म्हटलंय.

संजय राऊतांवर शिंदे गटाचा ठपका

यात मोठा आरोप लावण्यात आलाय तो संजय राऊत यांच्यावर. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना धमकी दिल्याचा लेखी युक्तीवाद करण्यात आलाय. यावेळी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा उल्लेख करत संजय राऊतांच्या या धमकीबद्दल सांगण्यात आलंय.

“या आमदारांना विधीमंडळात बघून घेऊ. जे आमदार सोडून गेलेत त्यांना महाराष्ट्रात परतणं आणि फिरणं मुश्किल होईल” या आशयाच्या राऊतांच्या माध्यमातील प्रतिक्रियेचा उल्लेख करत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकप्रतिनिधींना धमकी दिल्याचं म्हटलंय.

निवडणूक आयोगाने कोणाचीही बाजू न ऐकून घेता शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल ठाकरे गटाने याआधी आरोपही केले होते. तसंच शिंदे गटानेही ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडून धमक्या येत असल्याचा आरोप माध्यमांमधून केला होता. हे दोन्ही आरोप ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या लेखी युक्तीवादात दिले आहेत. पण, ठाकरे गटाने शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल घेतलेल्या आरोपावर निवडणूक आयोगात दाद मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT