सातारा : उदयनराजे म्हणजे नारळफोड्या गँग; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची टीका
–इम्तियाज मुजावर, सातारा ‘जशी सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल, तसा यांचा नारळ फोडण्याचा उपक्रम सुरु राहील. त्यामुळे जनतेनं नारळ फोड्या गॅंगपासून सावध रहावे’, असं म्हणत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. ‘जे आपण केलंच नाही, ते केलं सांगत हे तुम्हांला भुलवतील’, असं टीकास्त्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर डागलं आहे. […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
‘जशी सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल, तसा यांचा नारळ फोडण्याचा उपक्रम सुरु राहील. त्यामुळे जनतेनं नारळ फोड्या गॅंगपासून सावध रहावे’, असं म्हणत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. ‘जे आपण केलंच नाही, ते केलं सांगत हे तुम्हांला भुलवतील’, असं टीकास्त्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर डागलं आहे.
‘शाहूपूरीवासियांना 20 वर्षापासून तुम्ही वंचित ठेवलं, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी तुमच्यावर केला आहे’, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारण्यात आला होता. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, ‘जे काम मंजूर होतं त्याचा नारळ फोडायला ही मंडळी पुढं असतात’, असा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना लगावला.
‘लोटांगण घाला, पण नगरपालिकेला लोळवायची वेळ आनु नका’, शिवेंद्रराजे भोसलेंचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
