‘गीतेमध्येही जिहादची गोष्ट’; काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं विधान वादात, भाजपची टीका
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या एका विधानावरून वाद सुरू झालाय. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘जिहाद फक्त कुराण शरीफमध्येच नाही, महाभारतातल्या गीतेमध्येही आहे. श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादची गोष्ट सांगितलीये, असं विधान शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. यावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केलीये. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते मोहसीना किडवई […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या एका विधानावरून वाद सुरू झालाय. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ‘जिहाद फक्त कुराण शरीफमध्येच नाही, महाभारतातल्या गीतेमध्येही आहे. श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादची गोष्ट सांगितलीये, असं विधान शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलंय. यावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केलीये.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते मोहसीना किडवई लिखित पुस्तकाचं प्रकाशन झालं. दिल्लीत झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर यांनी पुस्तकाबद्दल भाष्य करताना जिहादबद्दलही भाष्य केलं.
‘श्रीकृष्णाने अर्जूनाला जिहादची गोष्ट सांगितली’; शिवराज पाटील चाकूरकर नक्की काय म्हणालेत?
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “इस्लाममध्ये जिहादची खूप चर्चा झालीये, असं म्हटलं जातं. आता संसदेत आम्ही जे काही काम करतोय, ते जिहादच्या अनुषंगाने नाहीये. आम्ही विचाराच्या अंगाने काम करतोय.”
“जिहादची गोष्ट कधी कधी येते. जिहादचा मुद्दा तेव्हा येतो, जेव्हा मनात चांगले विचार असतील, त्यासाठी प्रयत्न करूनही जर कुणी समजून घेत नाही. करत नाही. आणि त्यावेळी म्हटलं जातं की तुम्हाला शक्तीचा वापर करायचा असेल, करायला पाहिजे”, असं मत शिवराज पाटील चाकूरकर यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केलं.