Shivsena : शिंदे गटाची तिन्ही नावं बाळासाहेब ठाकरेंभोवती केंद्रीत; चिन्हंही ठरली!
मुंबई : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटाकडूनही नाव आणि चिन्हांच्या तीन पर्यायांचे पत्र आयोगाला देण्यात आले आहे. शिंदे गटाने सुचविलेल्या पर्यायी चिन्हांमध्ये उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा समावेश आहे. तर नावांमध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. शिंदे गटाची तिन्ही नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटाकडूनही नाव आणि चिन्हांच्या तीन पर्यायांचे पत्र आयोगाला देण्यात आले आहे. शिंदे गटाने सुचविलेल्या पर्यायी चिन्हांमध्ये उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा समावेश आहे. तर नावांमध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. शिंदे गटाची तिन्ही नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती केंद्रीत झालेली दिसतात.
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन पर्यायी नावांचे आणि चिन्हांचे ३ पर्याय देण्याचे आदेश देण्यात आले होते. सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत हे पर्याय देण्याची मुदत होती. गटाचे नवीन नाव आणि चिन्ह कोणतं असावं हे ठरविण्यासाठी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पक्षचिन्ह आणि पक्षाचं नवं नाव काय असेल याची चर्चा झाली.
ठाकरे गटाची तीन नावं आणि पर्याय :
दरम्यान रविवारी दुपारी ठाकरे गटाकडूनही नाव आणि चिन्हांचे ३ पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले. याबाबतचे पत्र ठाकरे गटाची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील ऑन रेकॉर्ड वकील विवेक सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले.
हे वाचलं का?
ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. तर नावांसाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावांचा पर्याय सुचविण्यात आला आहे. नाव आणि चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंतीही आयोगाला करण्यात आली आहे.
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) नाव मिळण्याची शक्यता कमी? :
उद्धव ठाकरे गटाने शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाचा पर्याय सुचविला आहे. मात्र शिंदे गटाकडूनही याच नावाची मागणी केली आहे. या दोन्ही गटांनी एकाच नावाची मागणी केल्याने ते कोणालाही न मिळण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव ठाकरे गटाला मिळू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT