Uddhav Thackeray आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच – संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट हा दिवसभर चर्चेचा विषय ठरतो आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की जे विषय पंतप्रधानांपुढे मांडले त्यातले अर्धे राज्याच्याच अखत्यारितले आहेत. तर आता याच भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट हा दिवसभर चर्चेचा विषय ठरतो आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की जे विषय पंतप्रधानांपुढे मांडले त्यातले अर्धे राज्याच्याच अखत्यारितले आहेत. तर आता याच भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी हे जर भेटले तर चर्चा तर होणारच. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत शिवसेना खासदार संजय राऊत?
हे वाचलं का?
ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट झाली असेल तर चर्चा होणारच असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे सगळे जण आज दिल्लीत भेटले. त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीची. या भेटीनंतर महाराष्ट्रातली सत्ता समीकरणं बदलणार का? अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही भेट झाली असेल तर ही बाब सकारात्मक आहे. आता ही भेट आणि त्याचे काय अर्थ आहेत हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकतं. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनी पंतप्रधानांना भेटून विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले?
मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.
50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यात यावी
इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो
मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण हा विषयही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला आहे
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही आम्ही पंतप्रधानांकडे मांडला
GST चं येणं लवकर मिळावं यासाठीही विनंती केली आहे
शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत अटी-शर्थी संबंधी आम्ही बीड मॉडेल तयार केलं आहे त्याबद्दलही चर्चा केली
बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं आदळत आहेत, तौक्ते वादळानेही दणका दिला. या वेळी जे मदत केली जाते ते निकष जुने झाले आहेत. आता ते निकष बदलण्याची गरज आहे याबाबतही आम्ही चर्चा केली
चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी मिळण्याबाबत चर्चा केली
मराठी भाषा दिन असतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलली जावीत अशीही विनंती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT